Home /News /entertainment /

सुरज पांचोली कामाच्या शोधात; घराणेशाहीच्या आरोपामुळं झाला बेरोजगार

सुरज पांचोली कामाच्या शोधात; घराणेशाहीच्या आरोपामुळं झाला बेरोजगार

“लोक जेव्हा मला घराणेशाहीचं उत्पादन म्हणतात तेव्हा मला प्रचंड राग येतो. चित्रपट मिळवण्यासाठी मी प्रचंड स्ट्रगल केलं आहे” असा दावा त्यानं केला. (Nepotism in Bollywood)

    मुंबई 21 मार्च: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूमुळं बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला आहे. अनेकजण स्टार किड्सवर टीका करत आहेत. त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी देखील केली जात आहे. दरम्यान या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेता सुरज पांचोली (Suraj Pancholi) यानं देखील उडी घेतली आहे. “लोक जेव्हा मला घराणेशाहीचं उत्पादन म्हणतात तेव्हा मला प्रचंड राग येतो. चित्रपट मिळवण्यासाठी मी प्रचंड स्ट्रगल केलं आहे” असा दावा त्यानं केला. (Nepotism in Bollywood) सुरजनं दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं घराणेशाहीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “बॉलिवूडमध्ये केवळ टॅलेंट टिकतं ओळख नाही. जेव्हा तुमचे चित्रपट फ्लॉप होतात प्रेक्षक तुम्हाला नाकारतात तेव्हा तुम्हाला कोणीही चित्रपट देत नाही. त्यामुळं घराणेशाहीच्या मुद्द्यावर वाद घालणंच मुळात चूकीचं आहे. मला देखील अनेकदा घराणेशाहीचं उत्पादन म्हणून चिडवलं जातं. अशा लोकांचा मला प्रचंड राग येतो.” अवश्य पाहा - प्रियांकाला करायचं नव्हतं निकसोबत लग्न; कारण वाचून बसेल धक्का “चित्रपट मिळवण्यासाठी मी देखील प्रचंड मेहनत केली आहे. ऑडिशन्स दिले आहेत. अनेक ठिकाणी रिजेक्ट झालो आहे. त्यानंतर मला काही चित्रपट मिळाले. प्रेक्षकांनी माझं काम पाहून मला नकार दिला तर समजू शकतो पण केवळ माझे वडिल अभिनेता होते म्हणून मला नाकारत असतील तर ते चूकीचं आहे. आता ही इंडस्ट्री पहिल्यासाठी राहिलेली नाही. काही फिल्मी कुटुंबातील कलाकारांना नाकारलं जातं. जरी त्यांच्यात टॅलेंट असलं तरी देखील त्यांना संधी मिळत नाही अन् यामुळं मी त्रस्त आहे.” सुरज हा अभिनेते आदित्य पांचोली यांचा मुलगा आहे. त्यानं 2010 साली गुजारीश या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर सलमानच्या एक था टायगर या चित्रपटात तो झळकला. पुढे हिरो या चित्रपटात त्यानं मुख्य नायकाचं काम केलं. मात्र त्याचे चित्रपट जोरदार आपटले. तिकिटबारीवर त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक समिक्षकांनी त्याच्या अभिनयाची देखील खिल्ली उडवली. सध्या तो बेरोजगार असून चित्रपटांच्या शोधात आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Suraj pancholi

    पुढील बातम्या