Home /News /entertainment /

प्रियांकाला करायचं नव्हतं निकसोबत लग्न; कारण वाचून बसेल धक्का

प्रियांकाला करायचं नव्हतं निकसोबत लग्न; कारण वाचून बसेल धक्का

प्रियांका चोप्रा हे नाव आत्ता फक्त बॉलीवूड पुरता मर्यादित राहिलेलं नाही. तर हे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा तितक्याच वेगाने झळकत आहे. नुकताच प्रियांका चोप्रा एका अमेरिकन कार्यक्रमात झळकली होती. ‘सुपर सोल’ असं या कार्यक्रमाचं नाव आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध होस्ट ओपरा विनफ्रे या कार्यक्रमाच्या होस्ट आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 मार्च:  प्रियांका चोप्रा हे नाव आत्ता फक्त  बॉलीवूड पुरता मर्यादित राहिलेलं नाही. तर हे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा तितक्याच वेगाने झळकत आहे. नुकताच प्रियांका चोप्रा एका अमेरिकन कार्यक्रमात झळकली होती. ‘सुपर सोल’ असं या कार्यक्रमाचं नाव आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध होस्ट ओपरा विनफ्रे या कार्यक्रमाच्या होस्ट आहेत. त्यांनी प्रियांकांची मुलाखत घेतली होती. या कार्यक्रमात प्रियांकाने आपल्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. महत्वाचं म्हणजे प्रियांकाने निक आणि आपल्या नात्याबद्दल एक महत्वाचा खुलासा केला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रियांकाला या कार्यक्रमात तिच्या लग्नाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर दिलेल्या उत्तराने सर्वच लोक आश्चर्यचकित झाले आहेत. प्रियांकाने म्हटलं आहे की, ती निकच्या बाबतीत अजिबात गंभीर नव्हती. ज्यावेळी निक तिला मेसेज करत होता. तेव्हा प्रियांका त्याकडे दुर्लक्ष करत होती. त्याचं कारणही तसचं आहे. प्रियांका म्हणते मला आता डेट वगेरे करण्यात अजिबात रस नव्हता. माझं वय 35 होतं. आणि मला आता लग्न करून आयुष्यात  सेटल व्हायचं होतं. मला लग्नं आणि मुले हवी होती. म्हणून मी निकच्या डेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करत होते. त्यानंतर प्रियांकानं म्हटलं आहे. मात्र मी जेव्हा निकला भेटले. माझं पूर्ण आयुष्यचं बदललं. इतक्या कमी वयात इतका समझदार व्यक्ती नाही पहिला. तसेच माझ्या स्वप्नांना घेऊन इतका उत्साही असणारा. माझ्या प्रत्येक अचिव्हमेंटवर इतका आनंदी असणारा. इतका आत्मविश्वासी व्यक्ती मी पहिल्यांदा पहिला. आणि मी त्याच्या प्रेमात पडले. (हे वाचा:  ‘लहान कपड्यांमुळं स्टेजवरुन धक्का मारुन खाली उतरवलं’; गायिकेनं सांगितला अनुभव ) प्रियांकाने म्हटलं आहे की, निक जोनाससोबत लग्न करायच्या आधी, तिनं आपल्या आईचा सल्ला देखील घेतला होता. ती म्हणते की मी माझा आईवडिलांना पाहीलंय. ते दोघे किती समजूतदारपणे आपलं नातं सांभाळत होते. त्यांनी एकमेकांना किती सहकार्य केलं आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर एकमेकांना आधार दिला आहे. आणि किती सुंदररित्या आपलं नातं फुलवलं होतं.प्रियांका चोप्रा 2017 मध्ये पहिल्यांदा निकला भेटली होती. त्यानंतरआणखी काही वेळा त्यांना एकत्र पाहण्यात आलं होतं.  2018 मध्ये प्रियांका आणि निकने लग्नं केलं होतं.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Priyanka chopra

    पुढील बातम्या