जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सूर नवा ध्यास नवा 2021: कोण ठरणार नव्या पर्वाची महागायिका?

सूर नवा ध्यास नवा 2021: कोण ठरणार नव्या पर्वाची महागायिका?

सूर नवा ध्यास नवा 2021: कोण ठरणार नव्या पर्वाची महागायिका?

सहा गायिकांमधून कोणाची होणार निवड? पाहा कसा रंगणार महाअंतिम सोहळा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 13 जून: कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनी वरील सर्वात जास्त चर्चेत राहणारा रियॅलिटी शो ‘सूर नवा ध्यास नवा’ (Sur Nava Dhyas Nava) आता अंतिम टप्प्यात आला आहे. तर आता सहा फायनलिस्टही मिळाले असून महागायिका कोण होणार याची चुरस रंगलेली दिसत आहे. एकाहून एक अधिक परफॉर्मन्सेस देणाऱ्या या गायिंकामध्ये नक्की कोणाची निवड होणार याची प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे. अनेक स्पर्धकांच्या एलिमिनेशन नंतर अखेरच्या सहा गायिका निवडण्यात आल्या आहेत. रश्मी मोघे, राधा खुडे, प्रज्ञा साने, संपदा माने, संमिता धापटे-शिंदे आणि श्रीनिधी देशपांडे या गायिका अंतिमफेरीत पोहोचल्या आहेत. (Sur nava Dhyas Nava grand finale)

जाहिरात

एकाहून एक सरस परफॉर्मन्सेस देणाऱ्या गायिका असल्याने परिक्षकांचीही मोठी परीक्षाच पाहायलाच मिळत आहे. याशिवाय नक्की कोण विजेती होणार याची प्रेक्षकांमध्येही सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. कार्यक्रमाचे परिक्षक गायक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) आणि महेश काळे (Mahesh Kale) हे असून त्यांचेही उत्तम परफॉर्मन्सेस महाअंतिम सोहळ्यात पाहायला मिळणार आहेत.

कोणाचा मंजूळ तर कोणाचा खमका आवाज कार्यक्रमात ऐकायला मिळाला. प्रत्येक शैलीतील गाणी स्पर्धकांनी गायली. वोटींगच्या सहाय्याने विजेता निवडला जाणार असल्याने ज्या स्पर्धकाला भरघोस मतं मिळतील तो विजेता ठरेलं. रविवारी 13 जूनला संध्याकाळी हा महाअंतिम सोहळा टीव्हीवर दिसणार आहे.

Most Desirable Women; या आहेत TV वरील सर्वात प्रभावी महिला

काही महिने या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन केलं. तर आता हे पर्व संपत आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहे. अनेकदा स्पृहाच्या मिश्किल जोक्सने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढायची.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात