जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Superstar Singer 2: बापरे! एका एपिसोडसाठी पवनदीप-अरुणिता घेतात एवढे मानधन, मराठमोळी सायलीही मागे नाही

Superstar Singer 2: बापरे! एका एपिसोडसाठी पवनदीप-अरुणिता घेतात एवढे मानधन, मराठमोळी सायलीही मागे नाही

Superstar Singer 2: बापरे! एका एपिसोडसाठी पवनदीप-अरुणिता घेतात एवढे मानधन, मराठमोळी सायलीही मागे नाही

Superstar Singer 2 मध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजिलाल, सायली कांबळे, मोहम्मद दानिश आणि सलमान अली हे पाच कॅप्टन आहेत. इंडियन आयडॉलचे हे स्पर्धक आता कॅप्टन्स म्हणून या शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. तुम्हाला माहित आहे का या कॅप्टन्सचे मानधन किती आहे?

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 25 एप्रिल: सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर 2’ (Superstar Singer 2) सुरू झाला आहे. यामध्ये जेष्ठ गायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik), जावेद अली (Javed Ali) आणि हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) हे परिक्षक आहेत. तर पवनदीप राजन, अरुणिता कांजिलाल, सायली कांबळे, मोहम्मद दानिश आणि सलमान अली हे पाच कॅप्टन आहेत. इंडियन आयडॉलचे हे स्पर्धक आता कॅप्टन्स म्हणून या शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. सुपरस्टार सिंगरसाठी त्यांना मिळणारं मानधनही अफाट आहे, जाणून घ्या किती आहेत त्यांच्या फीज? इंडियन आयडॉल सीझन 12 ची (Indian Idol Season 12) ट्रॉफी जिंकल्यानंतर पवनदीप राजन (Pawandeep Rajan) चांगलाच चर्चेत आहे. अरुणिता कांजिलालसोबतचे (Arunita Kanjilal) त्याचे म्युझिक व्हिडीओ लोक पसंत करत आहेत. दरम्यान त्याच्या जबरदस्त गायनामुळे आणि मेहनतीमुळे त्याला ‘सुपरस्टार सिंगर’च्या दुसऱ्या सिझनमध्ये कॅप्टन बननण्याची संधी मिळाली आहे. पवनदीप राजन या शोमध्ये एका एपिसोडसाठी 45 हजार रुपये मानधन घेतो. केवळ पवनदीपच नाही तर अरुणिता कांजीलालदेखील या शोमध्ये कॅप्टन म्हणून दिसत आहे. सोनी टीव्हीवर येणाऱ्या या शोमध्ये अरुणिता छोट्या गायकांना गाण्यासाठी ट्रेन करताना दिसणार आहे. इंडियन आयडॉल आणि त्यानंतर पवनदीपसोबत काही व्हिडीओज करून लोकप्रिय झालेल्या अरुणिताच्या गायनाचे लोक फॅन बनले आहेत. ‘इंडियन आयडॉल’मध्ये फायनलिस्ट राहिलेली अरुणिता सिंगिंग सुपरस्टारच्या एका भागासाठी 40 हजार रुपये मानधन घेते. या संदर्भात बॉलिवूड लाइफ ने वृत्त दिलंय. हे वाचा- ‘तू माझ्या आयुष्यातला महत्वाचा भाग, लव्ह यू…’; लागिर झालं जी फेम आज्याची तिच्यासाठी खास पोस्ट ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) ची सेकंड रनर-अप मराठमोळी सायली कांबळे (Sayali Kamble) सतत चर्चेत असते. सायली कांबळे सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सायली 24 एप्रिल रोजी लग्नबंधनात (Wedding) अडकली आहे. गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी तिचा प्रियकर धवलसोबत तिने साखरपुडा केला होता. दरम्यान, सायलीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती सध्या ‘सिंगिंग सुपरस्टार’मध्ये कॅप्टन म्हणून दिसत आहे. सायलीला या शोच्या एका एपिसोडसाठी 20 ते 25 हजार रुपये मिळतात. शोच्या काही प्रोमोमध्ये सायली अतिशय सुंदर दिसत आहे.

    जाहिरात

    ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol) शोमध्ये आपल्या भारदस्त आवाजाने लोकांना वेड लावणारा स्पर्धक म्हणजे मोहम्मद दानिश (Mohammad Danish) होय. दानिशच्या भारदस्त आवजाने अनेकांची मनं जिंकली. दानिश गाणं तर उत्तम गातोच; पण त्याला अभिनयाचीसुद्धा तितकीच आवड आहे. ‘इंडियन आयडॉल’मुळे लोकप्रिय झालेला दानिश आता पवनदीप राजन, अरुणिता आणि सायली कांबळे यांच्यासोबत सुपरस्टार सिंगरच्या दुसऱ्या सिझनमध्ये कॅप्टन म्हणून दिसणार आहे. दानिशला या शोच्या एका एपिसोडसाठी 30 हजार रुपये मानधन मिळतं. हे वाचा- Indian Idol फेम सायली कांबळेने बांधली लग्नगाठ, समोर आला पहिला PHOTO इंडियन आयडॉल 10 चा विजेता सलमान अली (Salman Ali) ‘सुपरस्टार सिंगर 2’ च्या नवीन सीझनमध्ये कॅप्टन म्हणून दिसतोय. सलमानच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. त्याची शैली रसिकांना खूप आवडते. या शोमध्ये त्याला एका एपिसोडसाठी 50 हजार रुपये मानधन दिलं जातं. सिंगिंग सुपरस्टारच्या दुसऱ्या सिझनमध्ये तीन जजेसच्या पॅनलसह हे पाच कॅप्टनदेखील दिसणार आहेत. इंडियन आयडॉलनंतर ही तरुण गायकांची टीम पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार असून या शोमध्ये लहान मुलांचं गायनाचं टॅलेंट पाहायला मिळणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात