जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Indian Idol फेम सायली कांबळेने बांधली लग्नगाठ, समोर आला पहिला PHOTO

Indian Idol फेम सायली कांबळेने बांधली लग्नगाठ, समोर आला पहिला PHOTO

Indian Idol फेम सायली कांबळेने बांधली लग्नगाठ, समोर आला पहिला PHOTO

गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी तिचा प्रियकर धवलसोबत (Dhawal) तिने साखरपुडा उरकला होता. आणि आता या दोघांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल- ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayali Kamble) सतत चर्चेत असते. यावेळी ती आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सायली कांबळे आज लग्नबंधनात (Wedding) अडकली आहे. गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी तिचा प्रियकर धवलसोबत (Dhawal) तिने साखरपुडा उरकला होता. आणि आता या दोघांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे.

News18

सायली कांबळेचा खास मित्र आणि इंडियन आयडॉलचा 12चा लोकप्रिय स्पर्धक निहाल तौरोने सायलीच्या लग्नाचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निहाल तौरोने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सायलीच्या लग्नाच्या विविध विधी शेअर केल्या आहेत. यामध्ये सायली नवरीच्या रूपात एन्ट्री घेताना दिसत आहे. सायलीने लग्ना साठी पिवळ्या रंगाची पारंपरिक महाराष्ट्रीयन काठपदराची साडी निवडली आहे. तर धवलने पेशवाई लुक केलेला आहे.नवरा-नवरीच्या गेटअपमध्ये हे दोघेही फारच सुंदर दिसत आहेत.

News18

सायली कांबळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. गेल्या काही दिवसांपासून सायली आपल्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. काल आणि परवा सायलीचा मेहेंदी आणि हळदी समारंभ पार पडला. गायिकेने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपल्या मेहेंदीसोहळ्याची झलक शेअर केली होती. सायलीने काही फोटो शेअर केले होते. यामध्ये मेहेंदीच्या कोनने सजवलेलं ताट ठेवण्यात आलं होतं. त्यांनतर तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या गर्ल गॅंगसोबत धम्माल करताना दिसून अली होती.

News18

सायलीच्या लग्नाचे फोटो तिने अजून शेअर केलेले नाहीत. तत्पूर्वी निहालने आपल्या मैत्रिणीच्या लग्नाची खास झलक चाहत्यांना दाखवली आहे. सायली कांबळेने इंडियन आयडॉल संपल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत, धवलसोबत आपल्या नात्याची अधीकृत घोषणा केली होती

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात