मुंबई 19 जून : सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) हे नुकतेच अमेरीकेला रवाना झाले आहेत. रजनीकांत यांना चेन्नई एअरपोर्टवर (Chennai Airport) स्पॉट करण्यात आलं होतं. ते पत्नी लता यांच्यासोबत अमेरीकेला गेले आहेत. तर काही आठवडे ते तिथेच घालवणार असल्याचंही समजतं आहे. 18 जूनच्या रात्री ते चेन्नई एअरपोर्टवर दिसले होते. मेडीकल चेकअपसाठी ते गेले असल्याचं समोर येत आहे. याशिवाय त्यांच्या काही मेडीकल टेस्टही होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला जाण्यासाठी केंद्र सरकारकडून मदतही मागीतली होती. नंतर त्यांना केंद्र सरकारकडूनही परवानगी देण्यात आली होती.
Superstar #Rajnikanth, who was scheduled to travel to the United States for a medical check-up, has been given the green signal for the tour. He had earlier requested the central government to grant him permission due to the ongoing #COVID19 pandemic. pic.twitter.com/rC5gyhhmyX
— FilmiFever (@FilmiFever) June 19, 2021
त्यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांना आता त्यांच्या प्रकृतीची चिंता सतावत आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. (Rajnikanth went to America)
‘या’ प्रसिद्ध खलनायकांच्या पत्नी लाईमलाइटपासून राहिल्या दूर; आहेत फारच सुंदररजनीकांत यांचा जावई अभिनेता धनुष (Dhanush) आणि मुलगी आधीच अमेरिकेत आहे. तर आता रजनीकांतही पत्नीसोबत पोहोचले आहेत. जुलै महिन्यापर्यंत काही आठवडे तिथेच राहणार आहेत. अभिनेता धनुष हा त्याच्या हॉलिवूड (Hollywood) चित्रपटासाठी चित्रिकरण करत आहे. त्यामुळे तो मुलांसोबत आणि पत्नीसोबत तिथेच राहत आहे. रजनीकांत हे ‘अन्नात्थ्ये’ (Annatheye) या चित्रपटात दिसणार आहेत. लॉकडाउनपूर्वीच या चित्रपटाचं शुटींग सुरू झालं होतं. तर अजूनही डबींग बाकी आहे. मागील वर्षी ते ‘दरबार’ (Darbar) या चित्रपटात दिसले होते.