चेन्नई, 17 मे : देशात कोरोनाची (Corona) दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. यापैकी अनेक रुग्णांची प्रकृती ही गंभीर आहे. देशात सध्या सुरु असलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत अनेक चित्रपट कलाकार तसंच क्रिकेटपटू योगदान देत आहेत. सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) यांनी देखील या लढाईत त्यांचं योगदान दिले आहे.
रजनीकांत यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (MK Stalin) यांची भेट घेऊन मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 50 लाखांचं योगदान दिलं आहे. ऑल इंडिया रेडिओनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर रजनीकांत आणि स्टॅलिन यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी रजनीकांत यांनी सर्वांना कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
Superstar #Rajinikanth meets Tamil Nadu CM Stalin to handover a cheque for CM Corona Relief Fund. pic.twitter.com/OgcTQs7nrP
— All India Radio News (@airnewsalerts) May 17, 2021
रजनीकांत यांच्या मुलीचीही मदत
कोरोना महामारी विरुद्धच्या लढाईत रजनीकांत यांचं कुटुंब मैदानात उतरलं आहे. शनिवारी रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत (Soundarya Rajinikanth) तिचा नवरा विषागन (Vishagan) आणि सासरे वनानगमुडी (Vanangamudi) यांनी स्टॅलिन यांची भेट घेऊन 1 कोटींची देणगी दिली होती. रजनीकांत यांनी शुक्रवारी करोना व्हॅक्सीन कोविशिल्डचा (Covishield) दुसरा डोस चेन्नईतील खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला. यावेळी त्यांची मुलगी सौंदर्या देखील उपस्थित होती.
तामिळ सिनेमातील कलाकारांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत भरीव योगदान केले आहे. सूर्या (Suriya), किर्ती (Karthi), शिवकुमार (Sivakumar) यांनी सरकारला 1 कोटींची देणगी दिली आहे. तर दिग्दर्शक एआर मुर्गुादोस (AR Murugadoss), उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) आणि अजित यांनी 25 लाखांची मदत मुख्यमंत्री फंडाला दिली आहे.
लाजरी मुलगी कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री? पाहा मुक्ता बर्वेचा प्रेरणादायी प्रवास
लवकरच प्रदर्शित होणार नवा सिनेमा
रजीनकांत यांचा अन्नाथे (Annaatthe) या सिनेमाच्या शूटिंगसाठी 12 एप्रिल रोजी हैदराबादला गेले होते. एक महिन्याच्या शूटींगनंतर ते 12 मे रोजी चेन्नईत परतले. या सिनेमात रजनीकांतसह नयनतारा, मीना. खुशबू आणि प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Superstar rajnikant, Tamil nadu