त्यामुळे त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर एकाने विचारलं, तुम्ही लग्न कधी केलत तर दुसऱ्याने विचारलं, सिंदूर कोणाच्या नावाचा आहे. त्यामुळे यामगचं नेमक कारण काय हे तर गीता कपूरच सांगू शकतात. गीता या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. सतत त्यांचे निरनिराळे फोटो त्या पोस्ट करत असतात.View this post on Instagram
सध्या गीता या सुपर डान्सर्स शोमध्ये परिक्षक म्हणून काम करत आहेत. या शो मधील त्यांचे अनेक व्हिडीओज व्हायरल होतात.View this post on Instagram
‘असा मेसेज दिसल्यास व्हा सावध’; सोनू सूदनं चाहत्यांना केलं सतर्कतेचं आवाहन
तर मागील एपिसोड्स मध्ये कार्यक्रमात अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonakar) यांना उपस्थिती लावली होती. तेव्हा एक परफॉर्मन्सवर गीता मां भावूक झाल्या होत्या. त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरलं झाला होता. ‘सुपर डान्सर’ व्यतिरिक्त गीता यांनी अनेक रियॅलिटी शो मध्ये परिक्षकाची भूमिका बजावली आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Sony tv, Television show