जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुनील ग्रोवरवर का आली रस्त्यावर ज्यूस विकण्याची वेळ! VIDEO VIRAL

सुनील ग्रोवरवर का आली रस्त्यावर ज्यूस विकण्याची वेळ! VIDEO VIRAL

सुनील ग्रोवरवर का आली रस्त्यावर ज्यूस विकण्याची वेळ! VIDEO VIRAL

सुनीलनं (Sunil Grover)आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करत याला ‘अपनी डार्लिंग को ज्यूस पिलाओ’ असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओमध्ये सुनीलनं ज्यूसची किंमत 20 रुपये सांगितली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 1 मार्च : अभिनेता सुनील ग्रोवर (Sunil Grover)आपल्या कॉमिक टायमिंगनं रडणाऱ्या व्यक्तीलाही हसवू शकतो. सुनीलनं आपल्या हटके अंदाजानं आतापर्यंत अनेकांची मनं जिंकलं आहे. अभिनेता सोशल मीडियावरही (Social Media) मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो. अशात आता नुकतंच सुनीलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसाठी नवा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुनील ज्यूस विकताना दिसत आहे. सुनीलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करत याला ‘अपनी डार्लिंग को ज्यूस पिलाओ’ असं कॅप्शन दिलं आहे. काही दिवसांपूर्वी सुनील रस्त्यावर छोले विकताना दिसला होता. त्याच्या या व्हिडीओलाही चाहत्यांची पसंती मिळाली होती. आता त्याचा नवा व्हिडीओही चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये सुनीलनं ज्यूसची किंमत 20 रुपये सांगितली आहे. सुनीलचा हा अवतार पाहून चाहते हैराण आहेत, तर मित्र त्याची चेष्टा करत आहेत.

जाहिरात

सुनील ग्रोवर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तांडव या वेबसीरिजमधून एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तांडवमधील त्याच्या कामाचं भरपूर कौतुक झालं आहे. कामाबद्दल बोलायचं झाल्यास, सुनील आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये झळकला आहे. त्यानं गब्बर इज बॅक आणि भारत यासारख्या सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. दुसरीकडे कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद जगजाहीर आहे. मात्र, सुनील ग्रोवरनं द कपिल शर्मा शोमध्ये वापसी करावी अशी निर्माता सलमान खानचीही इच्छा आहे. अशात सगळं काही व्यवस्थित झाल्यास लवकरच चाहत्यांना कपिल आणि सुनीलला एकाच स्टेजवर पाहाता येईल, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात