Home /News /entertainment /

‘बघावं तेव्हा ही बाई गरोदरच असते’; नव्या फोटोशूटमुळं लिसा हेडन होतेय ट्रोल

‘बघावं तेव्हा ही बाई गरोदरच असते’; नव्या फोटोशूटमुळं लिसा हेडन होतेय ट्रोल

(Lisa Haydon troll) तू बघावं तेव्हा गरोदरच दिसतेच असं म्हणत तिची खिल्ली उडवली जातेय. यावर लिसानं देखील जोरदार प्रत्युत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली.

    मुंबई 13 जून: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) तिसऱ्यांदा आई होणार आहे. अलिकडेच तिनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. “बाळ जूनमध्ये जन्माला येईल. (Lisa Haydon Pregnant For Third Time) फक्त आळसामुळेच ही गुड न्यूज द्यायला उशीर झाला”, अशी गंमतीशीर पोस्ट शेअर करत तिनं चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. मात्र या बातमीमुळं काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. (Lisa Haydon troll) तू बघावं तेव्हा गरोदरच दिसतेच असं म्हणत तिची खिल्ली उडवली जातेय. यावर लिसानं देखील जोरदार प्रत्युत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली. लिसानं अलिकडेच एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. हे मॅगझिन गर्भवती स्त्रियांवर आधारित आहे. या मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती बेबी बंट फ्लॉन्ट करताना दिसली. यातील काही फोटो तिनं इन्स्टाग्रामवर देखील शेअर केले. मात्र या फोटोंमुळं इंटरनेटवर तिची खिल्ली उडवली गेली. ‘तू चूकीच्या माणसाशी पंगा घेतलास’; अभिनेत्याची सलमान खानला धमकी दिशा पटानी होती या अभिनेत्याच्या प्रेमात; समलैंगिकतेच्या आरोपांमुळं मोडलं लग्न ही बाई बघावं तेव्हा गरोदरच असते. आणखी किती मुलांना जन्म देणार आहेस? तुला गरोदर राहायला आवडतं का? अशा आशयाच्या कॉमेंट करत काही नेटकऱ्यांनी लिसाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर तिनं देखील गंमतीशीर प्रत्युत्तर देत त्यांची बोलती बंद केली. “हो मला गरोदर व्हायला आवडतं. हे क्षण मला खुप आवडतात. पण आता खूप झालं. यापुढे गरोदर राहणार नाही. कारण मला माझं आयुष्य एन्जोय करायचं आहे.” अशा आशयाचं ट्विट तिनं केलं. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत आहे. लिसाने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मॉडलिंग करिअरची सुरुवात केली होती. लिसा हेडन किंगफिशर गर्लही होती. एवढंच नाही तर बर्‍याच नामांकित मासिकांची कव्हर गर्ल बनली आणि तिच्या अभिनयाने लोकांना वेड लावलं. फेमिना, वर्व, एफएचएम आणि हार्पर बाजार यांसारख्या प्रसिद्ध मासिकांवर लिसा हेडनचे कव्हर फोटो आले आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment, Pregnant

    पुढील बातम्या