दियाच्या लग्नामुळं नवऱ्याच्या पहिल्या पत्नीला मनस्ताप, ट्रोलिंगवर दिली प्रतिक्रिया

दियाच्या लग्नामुळं नवऱ्याच्या पहिल्या पत्नीला मनस्ताप, ट्रोलिंगवर दिली प्रतिक्रिया

लग्न होताच दियाच्या अनेक चाहत्यांनी वैभवची पहिली पत्नी सुनैनाला त्याच्या लग्नाचे फोटो पाठवण्यास सुरुवात केली. अखेर त्याच्या या लग्नावर सुनैनाने प्रतिक्रिया दिली.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली. 39 वर्षीय दियानं तिचा खास मित्र वैभव रेखीची लग्न केलं. लक्षवेधी बाब म्हणजे दिया प्रमाणेच वैभवचं देखील हे दुसरं लग्न आहे. परिणामी लग्न होताच दियाच्या अनेक चाहत्यांनी वैभवची पहिली पत्नी सुनैनाला त्याच्या लग्नाचे फोटो पाठवण्यास सुरुवात केली. अखेर त्याच्या या लग्नावर सुनैनाने प्रतिक्रिया दिली. लग्नावरील विश्वास अद्याप उडालेला नाही असं प्रत्युत्तर तिनं दिलं आहे.

एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनैनानं तिला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ती म्हणाली, “माझा लग्न संस्थेवरील विश्वास अद्याप उडालेला नाही. वैभवचं लग्न होताच मला अनेक लोकांनी मेसेज केले, फोन केले, अनेकांनी फोटो आणि व्हिडीओज देखील सेंड केले. पण कोणीही माझी काळजी करु नये. मी माझ्या आयुष्यात खुश आहे. वैभवच्या लग्नामुळं मी खुश आहे. प्रत्येकानं आपल्या चांगल्या भविष्याच्या दिशेनं पाऊल ठेवायला हवं. लग्न हे खूप सुंदर नातं आहे.”

अवश्य पाहा - कन्यादान आणि पाठवणी का नाही?; दिया मिर्झानं टीकाकारांना दिलं उत्तर

दियाशी लग्न करणारा वैभव हा मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योजक आहे. शेअर मार्केट आणि विविध प्रकारच्या धातूंमध्ये तो पैसे गुंतवतो. दियाप्रमाणेच वैभवचं देखील हे दुसरं लग्न आहे. सुनैना रेखी असं त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. ती एक योगा कोच आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांना ती योगाचं प्रशिक्षण देते. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. दियानं 15 फ्रेब्रुवारी रोजी घरातच मोजक्याच लोकांना आमंत्रीत करुन लग्न केलं.

Published by: Mandar Gurav
First published: February 20, 2021, 8:50 AM IST

ताज्या बातम्या