मुंबई 3 जुलै: शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis government) सरकार आल्यानंतर मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्ज) साठीचं कारशेड आरेमध्येच बनणार या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. आणि समस्त पर्यावरण प्रेमींनी मुंबईच्या हरितसृष्टीवर राज्यसरकारला घाला घालू देणार नाही अशी भूमिका घेत या निर्णयाचा निषेध करण्यासाठी निदर्शनं करायचं ठरवलं आहे. आज रविवारी (3 जुलै) ला ‘आरे वाचवा’ (Save Aarey) अशी हाक देत असंख्य पर्यवर्णप्रेमींनी एकत्र जमून या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. या निर्णयावर अनेक कलाकारांनी सुद्धा निषेध नोंदवला आहे. मात्र अभिनेता (Sumeet Raghvan) सुमीत राघवनने आपल्या ट्विटरवरून राज्य सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. ‘आरे वाचावा’च्या हाकेला अनेक ठिकाणाहून सध्या समर्थन मिळाल्याने अनेक सामाजिक संस्था, सामान्य जनता मोठ्या संख्येने आज आरेच्या जंगलात दाखल होण्याची शक्यता आहे. असंख्य सोशल मीडिया पेज मिळून छोटे छोटे उपक्रम सुरु करत आहेत. (Sumeet raghvan supporting Aarey car shed decision) सुमीतने त्याच्या ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. ‘कुर्ला की आवाज’ या पेजचा एक स्क्रिनशॉट यात दिसत असून “आरेचं जंगल वाचवण्यासाठी एकत्र येऊया” असा संदेश त्यात देण्यात आला आहे. यावर सुमीतने मत मांडत असं म्हणलं,”एक वेगळा voice ऐका. मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे. आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे. आम्हाला @MumbaiMetro3 ही लवकरात लवकर सुरू व्हायला हवी आहे. राहिला मुद्दा carshed चा,तर #CarShedWahiBanega.. म्हणजे कुठे? तर #आरे मध्येच.”
एक वेगळा voice ऐका.
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) July 2, 2022
मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे.
आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे.
आम्हाला @MumbaiMetro3 ही लवकरात लवकर सुरू व्हायला हवी आहे.
राहिला मुद्दा carshed चा,तर #CarShedWahiBanega.. म्हणजे कुठे? तर #आरे मध्येच. pic.twitter.com/qA6EnjkRNR
शिवाय त्याने मा. मुख्यमंत्री एकांतः शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत या नात्यावर लवकरात लवकर पडदा टाका आणि कामाला सुरुवात करा असं सुद्धा म्हणलं आहे. “ @Dev_Fadnavis जी @mieknathshinde जी कळकळीची विनंती करतोय की आता ह्याच्यावर एकदाचा पडदा पाडा. हे नाटक दर दोन वर्षांनी सुरू राहिलं तर अर्थ नाही. जे मुंबईकर माझ्या मताशी सहमत आहेत त्यांनी आता आवाज करणं गरजेचं आहे. एक प्रोजेक्ट धड होऊ नये? पैसा,जीव,वेळ..काही किंमत आहे की नाही?”
@Dev_Fadnavis जी@mieknathshinde जी कळकळीची विनंती करतोय की आता ह्याच्यावर एकदाचा पडदा पाडा. हे नाटक दर दोन वर्षांनी सुरू राहिलं तर अर्थ नाही.
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) July 2, 2022
जे मुंबईकर माझ्या मताशी सहमत आहेत त्यांनी आता आवाज करणं गरजेचं आहे. एक प्रोजेक्ट धड होऊ नये?
पैसा,जीव,वेळ..काही किंमत आहे की नाही?
सध्या आरेच्या मुद्यावरून बराच गोंधळ उडताना दिसत आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर ठाकरे सरकारने आरेबद्दल घेतलेला निर्णय रद्द करत कारशेड आरेमध्येच होणार अशी भूमिका घेतली. त्यावर अनेक ठिकाणहून तीव्र निषेध वर्तवला जात आहे तर काही ठिकाणी पहिमबा दर्शवला जात आहे. यात विकासाचं काम रखडू नये असा विचार सुमीतने मांडलेला दिसत आहे.