जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री लवकर होणार आई, डोहाळे जेवणाचे फोटो आले समोर

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री लवकर होणार आई, डोहाळे जेवणाचे फोटो आले समोर

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री लवकर होणार आई, डोहाळे जेवणाचे फोटो आले समोर

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ( sukh mhanje nakki kay asta ) मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसणारी अभिनेत्री लवकर आई होणार आहे. सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली गोड बातमी.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 एप्रिल- स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ( sukh mhanje nakki kay asta ) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखाही लोकांच्या मनात घर करत आहेत. याच मालिकेतील देवकी ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड ( meenakshi rathod ) तिच्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. ही भूमिका खरं तर विनोदी नसून खलनायिकेकडे झुकणारी आहे. पण मीनाक्षी तिचा खास खट्याळ टच देत ती भूमिका साकारताना दिसते. मिनाक्षीने चाहत्यांसोबत नुकतीच गुडन्यूज(good news) शेअर केली आहे. मीनाक्षी राठोड( meenakshi rathod good news) ) लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर तिनं तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर मस्त ग्लो आला आहे हिरव्या आणि निळ्या रंगाच्या घागऱ्यामध्ये ती छान दिसत आहे. तिनं फुलांनी सजलेल्या झोपळ्यावर बसून हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा- मुलींच्या आनंदासाठी कार्तिक- दीपा येणार का एकत्र, काय असणार दोघांचा निर्णय? मीनाक्षी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे इन्स्टा रील्स भन्नाट असतात. मालिकेतील कलकारांसोबत ती भन्नाट रील्स करत असते. शिवाय तिचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करत असते.

जाहिरात

मीनाक्षी मुळची जालन्याची आहे. तिच्या अभिनयाची सुरुवात शाळेपासून झाली आहे. तिचे वडील कलाप्रेमी असल्यामुळे नाटक, अभिनय, नृत्य स्पर्धांमध्ये तिला आवर्जून भाग घ्यायला सांगायचे. कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिव्हलमध्येही ती नियमितपणे सहभागी व्हायची. परंतु तिचा अभिनयप्रवास सुरू झाला ती मुंबईला आली तेव्हापासून. अथक प्रयत्नांनंतर तिला ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या प्रसिद्ध नाटकात सावित्रीबाई यांची भूमिका मिळाली. या नाटकादरम्यान अभिनय म्हणजे नक्की काय हे तिला उमगत गेलं. या नाटकाचे त्यांनी पाच वर्षांत जवळपास साडे सातशे प्रयोग केले. इथून तिच्या करिअरला वेग मिळाला. तिच्या ‘खिसा’ नावाच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात