मुंबई, 3एप्रिल- स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा (rang maza vegla latest episod ) ही मालिका सततच्या ट्वीस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. मालिकेतील दीपा आणि कार्तिकची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या मुलींच्या भविष्यासाठी दीपा आणि कार्तिक एकत्र यावेत अशी सर्वांची इच्छा आहे. दीपिका आणि कर्तिकीला देखील वाटतं की आपल्याला असे आई- वडील असावेत. मात्र कार्तिक आणि दीपा याबद्दल कधी विचार करतील, असा प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतातवत आहे. नुकताच एक मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दीपिकाला दीपासाऱखी आई हवी आहे. तर कार्तिकीला कार्तिकसारखा बाब हवा आहे. या दोघींच्या इच्छेसाठी दीपा आणि कार्तिक कधी एकत्र येईल का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या दोघांचा नेमका निर्णय काय असणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार. वाचा- ‘असा एक जो न बोलताही बरच काही बोलतो…’ सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत दीपिका आणि कार्तिकीमुळे दीपा आणि कार्तिकमधील गैरसमज दूर होऊन ते नवीन आयुष्याला कधी सुरूवात करतील का…अशा अनेक प्रश्नांचा उलगडा हा मालिकेच्या येणाऱ्या भागात होणार आहे. मालिका सध्या वेगळ्या वळणावर आहे. त्यामुळे नवीन ट्वीस्ट पाहण्यासाठी चाहते देखील अतुर असतात.
दीपिका आणि कार्तिकीचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. अनेक जण या दोघींसाठी मालिका पाहत असल्याचे सांगताना दिसतात. अनेकदा या दोघींचे सेटवरील धमाल व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात.