मुंबई, 30 एप्रिल- स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं**’ ( sukh mhanje nakki kay asta )** ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखाही लोकांच्या मनात घर करत आहेत. याच मालिकेतील देवकी ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड ( meenakshi rathod ) तिच्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. ही भूमिका खरं तर विनोदी नसून खलनायिकेकडे झुकणारी आहे. पण मीनाक्षी तिचा खास खट्याळ टच देत ती भूमिका साकारताना दिसते. मीनाक्षीने चाहत्यांसोबत नुकतीच गुडन्यूज(good news) शेअर केली होती. शिवाय तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमुळे देखील चर्चेत आली होती. आता लवकरच ती बाळाला जन्म देणार आहे. त्यासाठी तिनं मालिकेतून ब्रेक घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत देवकीची भूमिका कोण साकारणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता याचं उत्तर आता प्रेक्षकांना देखील मिळालं आहे. एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, मालिकेत देवकीची भूमिका आता अभिनेत्री भक्ती रत्नपारखी ( bhakti ratnaparkhi ) निभावणार असल्याचे समोर आले आहे. भक्तीने झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत मॅडीची भूमिका गाजवली होती. याच मालिकेच्या सिक्वल मध्ये देखील ती हीच भूमिका निभावताना दिसली होती. मॅडीचे पात्र विनोदी स्वभावाचे आणि भोळसट होते. भक्तीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने हे पात्र सुरेख साकारले होते. आता देवकीच्या भूमिकेत प्रेक्षक तिला स्वीकारलतील का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. वाचा- ‘आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे ..‘अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत भक्ती रत्नपारखीविषयी थोडसं…. भक्ती रत्नपारखीनं उंबरठा, देऊळ, ओह माय गॉड अशा हिंदी तसेच मराठी चित्रपटातून तिने काम केले आहे. विनोदी अभिनेते निखिल रत्नपारखी यांच्यासोबत ती विवाहबद्ध झाली आहे. मीनाक्षीची मालिकेत भूमिका नकारात्मक असली तरी सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे. मालिका सोडल्यानंतर याचा मालिकेवर काय परिणाम होणार हे देखील येणाऱ्या काळात समजेलच. कारण प्रेक्षक सहजासहजी नवीन कलाकारस स्वीकारताना दिसत नाहीत. त्यामुळे भक्ती रत्नपारखी या भूमिकेस कसा न्याय देणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. तिच्यासाठी हे मोठं आव्हानचं असणार आहे. वाचा- ‘एक नदी पाहिजे…’ अभिनेत्री सई ताम्हणकरने अशी नेमकी काय केली मागणी? देवकीची भूमिका साकारणाऱ्या मीनाक्षीबद्दल थोडसं मीनाक्षी मुळची जालन्याची आहे. तिच्या अभिनयाची सुरुवात शाळेपासून झाली आहे. तिचे वडील कलाप्रेमी असल्यामुळे नाटक, अभिनय, नृत्य स्पर्धांमध्ये तिला आवर्जून भाग घ्यायला सांगायचे. कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिव्हलमध्येही ती नियमितपणे सहभागी व्हायची. परंतु तिचा अभिनयप्रवास सुरू झाला ती मुंबईला आली तेव्हापासून. अथक प्रयत्नांनंतर तिला ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या प्रसिद्ध नाटकात सावित्रीबाई यांची भूमिका मिळाली.
या नाटकादरम्यान अभिनय म्हणजे नक्की काय हे तिला उमगत गेलं. या नाटकाचे त्यांनी पाच वर्षांत जवळपास साडे सातशे प्रयोग केले. इथून तिच्या करिअरला वेग मिळाला. तिच्या ‘खिसा’ नावाच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.