जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे हातात नसते' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे हातात नसते' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे हातात नसते' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

नुकतचं मानसी नाईकनं एक रील्स सादर केले आहे. या रिल्सला तिनं एक कॅप्शन देखील दिली आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 एप्रिल- बघतोय रिक्षावाला फेम अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. नवरा प्रदीप खरेरा (Mansi Naik and Pradip Kharera) याच्यासोबतचे काही फोटो व व्हिडिओ देखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. याशिवाय मानसी नाईक (Mansi Naik latest video) नेहमीच तिच्या डान्सनं चाहत्यांचे मन जिंकताना दिसते. नुकतचं मानसी नाईकनं एक रील्स सादर केले आहे. या रिल्सला तिनं एक कॅप्शन देखील दिली आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. मानसी नाईक नेहमीच्या तिच्या रील्सनं चाहत्यांचे मन जिंकताना दिसते. तिचा डान्स व तिच्या अदा घायाळ करणाऱ्या अशाच असतात. मानसीनं नुकतचं आला आला…पाटील आला..या मराठी गाण्यावर रील्स सादर केलं आहे. हे इन्स्टा रील्स साद करत तिनं त्याला एक कॅप्शन देखील दिली आहे. सध्या तिचीही कॅप्शन सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या डान्सचं तर कौतुक होत आहेच पण कॅप्शनने देखील लक्षवेधून घेतलं आहे. वाचा- रणवीर सिंह नव्हे तर ‘या’ खास व्यक्तीसोबत दीपिका पादुकोण पोहोचली व्हेनिस मानसी नाईकनं व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की,आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,चांगली पाने मिळणे,आपल्या हातात नसते.पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते ⚖️..अनेकांनी तिच्या या कॅप्शनचे कौतुक केले आहे. तिच्य़ा या पोस्टवर हार्ट इमोजीचा पाऊस पडत आहे. एका नेटकऱ्य़ानं कमेंट करत म्हटलं आहे की, कॅप्शन आणि हॅटसॉफ केला आहे तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, एकच नंम्बर /जाळ/इस्तू….अशा अनेक कमेंट व लाईक्सचा वर्षाव मानसीच्या पोस्टवर होत आहे.

जाहिरात

मानसी नाईकने आपल्या नृत्याच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलेय. ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्याच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना चागलंच याड लावले होते. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ या सारख्या अनेक मराठी रियालिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून मानसी प्रेक्षकांच्या भेटीला आली. मानसी मराठी चित्रपटसृष्टीची चांगली नृत्यांगना आहे. मानसीने ‘एकता-एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ या चित्रपटात दमदार अभिनय केलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात