• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • आमिर खानने 'KGF 2' च्या मेकर्सची मागितली माफी! वाचा नेमकं काय घडलं

आमिर खानने 'KGF 2' च्या मेकर्सची मागितली माफी! वाचा नेमकं काय घडलं

Aamir Khan

Aamir Khan

आमिर खान (Aamir Khan) एक असा स्टार आहे, ज्याच्या चित्रपटांची सर्वांनाच प्रतीक्षा असते. कोरोना महामारीनंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यापासून त्याचे चाहते 'लाल सिंग चड्ढा' (Lal Singh Chaddha) चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • Share this:
    मुंबई, 25 नोव्हेंबर-  आमिर खान  (Aamir Khan)  एक असा स्टार आहे, ज्याच्या चित्रपटांची सर्वांनाच प्रतीक्षा असते. कोरोना महामारीनंतर  परिस्थिती पूर्वपदावर आल्यापासून त्याचे चाहते 'लाल सिंग चड्ढा'   (Lal Singh Chaddha)   चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, चाहत्यांना यासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. कारण आमिरचा हा चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे आमिरच्या या चित्रपटासोबतच अभिनेता यशचा ‘केजीएफ २’  (KGF 2)  हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. आमिर खानने का मागितली माफी- बॉक्स ऑफिसवरील हा संघर्ष कोण जिंकणार हे येणारा काळच सांगेल, मात्र या संघर्षामुळे आमिरने 'केजीएफ २'च्या निर्मात्यांची माफी मागितली आहे. इंडियन एक्सप्रेसने एका वृत्तात म्हटले आहे की, 'लाल सिंग चड्ढा' 14 एप्रिल रोजी रिलीज करण्याच्या निर्णयाबद्दल आमिरने 'KGF 2' आणि अभिनेता यशची माफी मागितली आहे. आमिर खानने ताज्या मुलाखतीत सांगितले की, चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्समुळे रिलीजला उशीर होत आहे. त्यामुळे आमिर खानकडे दोनच पर्याय आहेत. एकत्र काम पटकन उरकून चित्रपट लवकर प्रदर्शित करणे. किंवा काम बारकाईने करून चित्रपट थोडा उशिरा प्रदर्शित करणे. आमिरला घाई आवडत नसल्याने त्याने  दुसरा पर्याय निवडला होता. यामुळे आमिर खानला 'KGF 2' रिलीज होत असलेल्या दिवशी 'लाल सिंह चड्ढा' रिलीज करण्यास भाग पडले आहे. आमिरला त्याचा चित्रपट 'KGF 2' सोबत रिलीज करण्याची चिंता आहे. म्हणून त्याने त्याच्या टीमसोबत करार केला आहे.  ज्या अंतर्गत अभिनेत्याला 'KGF 2' ची जाहिरात करायची आहे. तो म्हणतो, 'मी माझे चित्रपट इतर चित्रपटांच्या प्रदर्शनासह प्रदर्शित करत नाही. मला दुसऱ्याची जागा घ्यायची नाही. माझा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट शीख धर्मीयांवर बनलेला असल्याने त्याला बैसाखीच्या दिवसापेक्षा चांगली रिलीज डेट मिळू शकत नाही. आमिर खानने दिलं वचन- आमिर खानने मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तो 'लाल सिंग चड्ढा' ची रिलीज डेट निश्चित करत होता तेव्हा त्याने 'KGF 2' चे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांशी बोलले होते आणि त्यांची अनेकदा माफी मागितली होती. त्याने त्याच्या चित्रपटासोबतच आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचे कारण देखील स्पष्ट केले आणि वचन दिले की तो 14 एप्रिल रोजी चित्रपटगृहात जाऊन त्याचा 'KGF 2' चित्रपट पाहणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published: