‘निर्माते 100 तास फुकट काम करुन घ्यायचे’; सुचित्रानं सांगितला संघर्षमय अनुभव

‘निर्माते 100 तास फुकट काम करुन घ्यायचे’; सुचित्रानं सांगितला संघर्षमय अनुभव

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल चित्रपटात केवळ एक सीन करता यावा यासाठी तिला तब्बल 100 तास बॅकस्टेज फुकट काम करावं लागत असे.

  • Share this:

मुंबई 15 एप्रिल: सुचित्रा पल्लई (Suchitra Pillai) ही बॉलिवूडमधील एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच तिनं संगीतकार, वादक, निवेदन, मॉडलिंग अशा विविक्ष क्षेत्रात काम केलं आहे. (success story) 90 च्या दशकात आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल चित्रपटात केवळ एक सीन करता यावा यासाठी तिला तब्बल 100 तास बॅकस्टेज फुकट काम करावं लागत असे.

सुचित्राचा जन्म 15 एप्रिल 1970 रोजी मुंबईतील एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. रंगभूमीवर काम करत तिनं आपल्या करिअरची सुरुवा केली. तिला संगीत या क्षेत्रातही विशेष रुची होती. त्यामुळं तिनं डेन्मार्कमध्ये जाऊन साऊंड इंजिनियरची पदवी घेतली. त्यानंतर या पदवीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्या शिक्षणाचा अनेकदा गैरफायदा घेतला.

अवश्य पाहा - शिक्षण विभागानं घेतला मोठा निर्णय; मलायकाच्या 'मुन्नी बदनाम'वर विद्यार्थी करणार अभ्यास

हिंदुस्तान या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रानं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं हा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “2001 साली बस इतना सा खाब है या चित्रपटातून मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्याआधी मी अनेक चित्रपटांमध्ये लहान लहान भूमिका साकारल्या आहेत. ही काम मिळवण्यासाठी मला प्रचंड संघर्ष करावा लागला. बॅकस्टेज लाईटिंगचं काम करणं, स्टार्ससाठी चहा पाण्याची व्यवस्था करणं, एडिटिंग करताना मदत करणं अशी विविधं कामं माझ्याकडून करुन घेतली जात होती. त्या वेळी बॅकस्टेज आर्टिस्टला तासांचे पैसे दिले जायचे. माझ्याकडून एका दिग्दर्शकानं 100 तास काम करुन घेतलं होतं. पण त्यानं पैसे दिले नाहीत. त्यानं केवळ एका सीनचे पैसे दिले. अशा प्रकारे काम करत मी करिअरची सुरुवात केली.” सुचित्रा आज बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Published by: Mandar Gurav
First published: April 15, 2021, 10:23 AM IST

ताज्या बातम्या