मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शिक्षण विभागानं घेतला मोठा निर्णय; मलायकाच्या 'मुन्नी बदनाम'वर विद्यार्थी करणार अभ्यास

शिक्षण विभागानं घेतला मोठा निर्णय; मलायकाच्या 'मुन्नी बदनाम'वर विद्यार्थी करणार अभ्यास

संगीत क्षेत्रातील शिक्षक, संगीतकार आणि अभ्यासकांच्या 15 जणांच्या पॅनलने मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

संगीत क्षेत्रातील शिक्षक, संगीतकार आणि अभ्यासकांच्या 15 जणांच्या पॅनलने मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

संगीत क्षेत्रातील शिक्षक, संगीतकार आणि अभ्यासकांच्या 15 जणांच्या पॅनलने मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

मुंबई 15 एप्रिल: इंग्लंडमध्ये डिपार्टमेंट फॉर एज्युकेशनने (डीएफई) सुरू केलेल्या नवीन संगीत अभ्यासक्रमाच्या गाण्यांच्या यादीमध्ये बॉलिवूडचं चार्टबस्टर गाणं ‘मुन्नी बदनाम हुई’ (Munni Badnaam Hui)हे समाविष्ट करण्यात आलं आहे. 2010 मध्ये आलेल्या दबंग(Dabangg)या चित्रपटातील हे गाजलेलं गाणं आहे. जगभरातील संगीतामधील विविधता समजून घेण्यासाठी डीएफई विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम चालवते. या अगोदर किशोरी अमोणकर(Kishori Amonkar)यांचे ‘सहेला रे’,अनुष्का शंकरचे(Anoushka Shankar)‘इंडियन समर’(Indian Summer),ए.आर. रहमान(AR Rahman)यांचे ‘जय हो’ ही भारतीय गाणी या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली आहेत. PTI नं दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडच्या संगीत क्षेत्रातील शिक्षक, संगीतकार आणि अभ्यासकांच्या 15 जणांच्या पॅनलने मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

“आधुनिक ब्रिटिशांची ओळख (British identity)ही समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे,हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्या ठिकाणी असे अनेक समुदाय आहेत जे त्यांची स्थानिक वैशिष्ट्ये संगीताच्या माध्यमातून एक्सप्लोर आणि साजरे करतात. अगदी त्यासारखीच परिस्थिती भारतात आहे. गानसरस्वती किशोरी अमोणकर या २० व्या शतकातील भारतीय शास्त्रीय संगीतातील आघाडीच्या गायिका होत्या.

अवश्य पाहा - ना सर्जरी ना ड्रग्ज... काय आहे मंदिरा बेदीच्या सौंदर्याचं रहस्य?

संगीत हे परमात्माशी संवाद साधण्याचं एक माध्यम आहे.असा किशोरीताईंचा विश्वास होता. त्यांनी भारतीय शास्रीय संगीताच्या माध्यमाकडे अध्यात्माचं साधन म्हणून पाहिलं.जगविख्यात सतार वादक रवीशंकर आणि त्यांची कन्या अनुष्का शंकर यांच्या इन्ट्रुमेंटल मेलडीजचादेखील या अभ्यासक्रमात समावेश आहे.

डीएफईने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय,‘‘मुन्नी बदनाम हुई’हे बॉलिवूडच्या (Bollywood)चित्रपटातील आयटम नंबर्सपैकी (Item numbers) आहे. अशा गाण्यांचा चित्रपटाच्या कथानकाशी थेट संबंध नसतो. पण या गाण्याचं चित्रकरण आकर्षक आहे आणि गाण्याच्या चालीत सांगितिक वैशिष्ट्य आहेत म्हणून आम्ही त्याचा समावेश केला आहे. आम्ही प्रॅक्टिकल पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातही शिक्षकांना प्रत्येक इयत्तेला शिकवणं सोपं जावं हाही आमचा प्रयत्न आहे.’

" isDesktop="true" id="540146" >

चित्रपटातील गाण्यात मलायका अरोरा खान नृत्य करत असताना चित्रपटाचा हिरो पोलीस अधिकारी चुलबुल पांडे म्हणजे अभिनेता सलमान खान तिथे येतो आणि मग नृत्यही करतो असं दाखवलं आहे. मलायका या चित्रपटाची निर्मातीही होती. मलायकाने इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर करून‘Woohoooo’अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि आनंद साजरा केला आहे.

‘मुन्नी बदनाम हुई’हे गाणं गायिका ममता शर्मा आणि ऐश्वर्या निगम यांनी गायलं असून ललित पंडित यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्यासाठी गायिका ममता शर्माला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर अवॉर्ड(Filmfare Award)मिळाला होता. तसंच गाण्याचे म्युझिक कंपोझर साजिद-वाजिद यांना बेस्ट म्युझिक डायरेक्टरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.‘मुन्नी बदनाम हुई’हे गाणं त्या वर्षीचे सर्वाधिक लोकप्रिय गाणं ठरलं होतं.

First published:

Tags: Rock music, Song