मुंबई 7 मे: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता होता. वर्षभरापूर्वी त्यानं आत्महत्या केली. अर्थात त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र आजही तो तितकाच चर्चेत असतो. रुपेरी पडद्यावर सोज्वळ भूमिका साकारणारा सुशांत वैयक्तिक आयुष्यातही तितकाच शांत आणि हुशार होता. अभिनयासोबतच अभ्यासही तो तितक्याच आवडीनं करायचा. अन् त्याचे हेच गुण विद्यार्थांना कळावे. (Success story of Sushant Singh Rajput) त्यांना देखील आयुष्यात काहीतरी चांगलं करुन दाखवण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी सुशांतच्या आयुष्यावरील एक धडा शालेय पुस्तकात सामिल करण्यात आला आहे. सुशांतची मैत्रीण स्मिता पारिख हिनं एका बंगाली शालेय पुस्तकाचा फोटो पोस्ट करुन ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली. या पोस्टद्वारे तिनं बंगाली शिक्षण मंडळाचे आभार मानले आहेत. “सुशांतकडून विद्यार्थांना खूप काही शिकता येईल. तो केवळ उत्तम अभिनेताच नव्हता तर आपल्या आई-वडिलांचा आदर करणारा एक आदर्श मुलगा देखील होता. अभिनयासाठी त्यानं शिक्षण सोडलं नाही किंबहूना शिक्षण देखील तितकच महत्वाच असतं याचं भान त्याला होतं. अन् त्याचे हे सर्व गुण विद्यार्थांना शिकता येतील” असा विश्वास तिनं या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सुशांतच्या चाहत्यांनी या धड्यासाठी शिक्षण मंडळाचे आभार देखील मानले आहेत. ऑलिंम्पिकमध्ये करायची होती गोळाफेक, पण…; पाहा अश्विनी भावे यांचा सिनेप्रवास
Another primary bangla textbook published our beloved @itsSSR ’s pic, to depict a family a father figure. @withoutthemind @divinemitz look at this.I am so proud of him. Clearly shows that our education board also feels he is the best. pic.twitter.com/hiyT1giMap
— Smita GLK parikh - 🦋🇮🇳 (@smitaparikh2) May 5, 2021
सुशांत सिंह राजपूत हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता होता. पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुशांत बॉलिवूडमध्ये देखील स्वत:ची अशी एक ओळख निर्माण केली होती. त्यानं ‘काय पो छे’, ‘पी.के.’, ‘एम.एस. धोनी – अनटोल्ड स्टोरी’, ‘छिछोरे’, ‘दिल बेचारा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्याला बॉलिवूडचा राईजिंग स्टार असं म्हटलं जात होतं. परंतु 14 जून 2020 रोजी संशयास्पद पद्धतीनं त्याचा मृत्यू झाला. पोलीस, सीबीआय आणि एनसीबी यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी झाली. परंतु त्याच्या आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या याबाबात चौकशी सुरु आहे.