जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ऑलिंम्पिकमध्ये करायची होती गोळाफेक, पण...; पाहा अश्विनी भावे यांचा सिनेप्रवास

ऑलिंम्पिकमध्ये करायची होती गोळाफेक, पण...; पाहा अश्विनी भावे यांचा सिनेप्रवास

ऑलिंम्पिकमध्ये करायची होती गोळाफेक, पण...; पाहा अश्विनी भावे यांचा सिनेप्रवास

‘अशीही बनवाबनवी’ फेम अश्विनी भावे यांनी अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नव्हता म्हणून बॉलिवूड चित्रपटांना दिला होता नकार

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 7 मे**:** अश्विनी भावे (Ashwini Bhave) या मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. (Marathi Movies) मनमोहक रुप आणि जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. आज त्यांचा वाढदिवस आहे. (Ashvini Bhave bollywood birthday) 49 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मराठीतील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कधीकाळी अभिनयापेक्षा जास्त रस त्यांना खेळात होता. अगदी देशासाठी ऑलंम्पिकमध्ये गोळाफेक करुन सुवर्णपदक मिळवावं अशीही स्वप्न त्या कधीकाळी पाहात होत्या. पण मधुकर तोरडमल यांच्या एका नाटकामुळं त्यांच्या आयुष्याला पुर्णपणे कलाटणी मिळाली. पाहुया काय होता तो प्रसंग… अश्विनी भावे यांचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. शाळेत असताना त्या सर्व स्पर्धामध्ये अगदी हिरिरीने भाग घ्यायच्या. पारितोषिकं मिळोत न मिळोत अगदी गोळाफेकपासून गीतापठणापर्यंत सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये उत्साहाने सहभागी होत असत. त्यांना अभिनयाची देखील आवड होती. याचदरम्यान ‘चंद्रलेखा’चे जगन्नाथ कांदळगावकर यांनी एका शालेय नाटकात काम करताना त्यांना पाहिलं. त्यांचा अभिनय त्यांना आवडला परिणामी त्यांच्या पुढच्या नाटकात काम करण्याची ऑफर त्यांना मिळाली. गगनभेदी असं या नाटकाचं नाव होतं. याचं दिग्दर्शन मधुकर तोरडमल यांनी केलं होतं. पुढे याच नाटकामुळं त्यांचं आयुष्य पुर्णपणे बदललं. हृतिकची पूर्व पत्नी सुझेन पुन्हा पडली प्रेमात? ‘त्या’ कमेंटने अनेकजणं चक्रावले! पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांना अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफर्स मिळत होत्या. पण अभ्यासाला पुरेसा वेळ मिळणार नाही म्हणून त्यांनी या चित्रपटांना नकार दिला. यापैकी त्यांनी नाकारलेल्या एका चित्रपटात तर माधुरी दिक्षीत हिनं देखील काम केलं होतं. अखेर 1986 साली शाबास सुनबाई या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी धडाकेबाज, वजिर, गोलात गोल, एक रात्र मंतरलेली अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र अश्विनी भावे हे नाव खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचलं ते ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटामुळं. या चित्रपटात त्यांनी माधुरी ही व्यक्तिरेखा साकारली होती. अन् आज 23 वर्षानंतरही ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये तितकीच लोकप्रिय. त्यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अशा प्रकारे कधीकाळी खेळात करिअर करण्याचा विचार करणाऱ्या अश्विनी भावे झाल्या एक लोकप्रिय अभिनेत्री.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात