मुंबई, 07 मे : सध्या 18 वर्षावरील सगळ्यांनाच लस (Corona vaccination) घेण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे अनेक जणं लस घेत आहेत. त्यात सेलिब्रिटीजचाही समावेश आहे. अनेकजन सध्या स्वत:च लसीकरण करत आहेत. व त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून इतरानांही लस घेण्याचं आवाहन करत आहेत. असाच एक फोटो अभिनेता अर्सल गोनी (Arslan Goni) याने पोस्ट केला होता. पण यावरील सुझेन खानची (Sussane khan) कमेंट विशेष ठरत होती. सुझेन म्हणजेच अभिनेता हृतिक रोशनची (Hritik Roshan) पूर्वाश्रमीची पत्नी. सुझेन आणि हृतिक हे एकमेकांपासून वेगळे झाले असले तरीही मुलांसोबत ते एकत्र वेळ घालवतात. पण सुझेन ने अर्सलच्या फोटोवर केलेल्या कमेंटने सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेता अर्सलनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात तो लस घेताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत अर्सलने ‘व्हॅक्सिन घ्या’ असे कॅप्शनही दिलं आहे.
या पोस्टवर त्याला त्याच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत पण सुझेनच्या कमेंटने सगळ्यांचचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुझेनने ‘सुपर’ अशी कमेंट केली आहे.
सुझेन आणि अर्सल हे अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत आहे. अनेकदा ते एकत्र स्पॉट होतात. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्यांच्या अफेअरची चर्चा आहे. तर या कमेंटने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
मलायका अरोरा, करीना कपूरचं आदर पूनावालांसोबत नातं काय? PHOTO मुळे चर्चांना उधाणहृतिक आणि सुझेनचं 2000 साली लग्न झालं होतं. पम काही कारणांनी 2014 मध्ये ते विभक्त झाले होते. तर त्यांना दोन मुलं देखिल आहेत. मुलांसोबत ते एकत्र स्पॉट होतात.

)







