ईशाला विक्रांतचं खरं रूप कळलंय. त्यामुळे विक्रांत सरंजामे मनातून हादरलाय. ते वरकरणी चांगलं वागतोय.
म्हणूनच विक्रांत ईशाला घेऊन बंद दरवाजाकडे जातो. ईशाच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी तो हे करतोय.
दरवाजा उघडतो आणि समोर राजनंदिनीचा फोटो पाहून ईशाला धक्का बसतो. पाण्यात तिनं हाच चेहरा पाहिला होता.
आता सुरू होणार विक्रांतचा भूतकाळ. म्हणजेच राजनंदिनीचा वावर सुरू होणार. प्रेक्षकांना नवी कथा पाहायला मिळणार.