मुंबई, 10 फेब्रुवारी : आजच्या काळात बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood celebrity) सोशल मीडियावर (Social media) खूप सक्रिय असतात. आपल्या खासगी आयुष्यातील क्षणांसह चित्रीकरणावेळचे फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अभिनेता जॉन अब्राहमसुद्धा (Bollywood actor john Abraham) याला अपवाद नाही.
जॉन अब्राहमनं सध्या आपल्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जॉन 'सत्यमेव जयते - 2' (Satyamev Jayte - 2) आणि 'पठाण'नंतर 'अटॅक'ची (attack) शूटिंग करताना दिसतो आहे. या अटॅक सिनेमासंदर्भातला जॉनचा एक व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल (viral video) होतो आहे. या व्हिडिओत जॉन धडाकेबाज पद्धतीनं रस्त्यावर बाईक (bike) चालवतो आहे. या स्टंटला (stunt) जॉननं आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) पेजवर शेअर केलं आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.
हेही वाचा 'अरे रे अरे ये क्या हुआ': गाण्यावरील अंकिताचे एक्सप्रेशन पाहून चाहते म्हणाले,...
विशेष गोष्ट ही, की या व्हिडिओला आतापर्यंत 8 लाखहून जास्तवेळा पाहिलं गेलं आहे. जॉनच्या या व्हिडिओमध्ये त्यांचा बिनधास्त अंदाज कमालीचा आकर्षक वाटतो आहे. हा व्हिडिओ खरोखरच चुकवू नये असा आहे. व्हिडिओ शेअर करताना जॉननं लिहिलं आहे, 'स्टंटिंग...'
याआधीही जॉननं अटॅकशी जोडलेला एक फोटो शेअर केला होता. यात तो बाईकवर बसलेला दिसतो आहे. क्रू मेंबर्स त्याच्या आसपास दिसत आहेत. जॉनच्या या फोटो आणि व्हिडिओनं आता त्याच्या चाहत्यांची उत्सुकता जास्तच वाढवली आहे.
करीनाची अवस्था पाहून बसेल धक्का, PHOTO आले समोर
जॉन लवकरच 'अटॅक'ची शूटिंग दिल्लीत करताना दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंह (Rakul preet Sinh) आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत असतील. या सिनेमाला जॉन अब्राहमसह जयंतीलाल गडा आणि अजय कपूर प्रोड्युस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.