बिहार, 2 मार्च: भोजपुरी चित्रपटसृष्टी त्यांच्या गाण्यांमुळे प्रसिद्ध आहे. त्यांची गाणी विशेष प्रसिद्ध होतात. पण त्यात अनेकदा डबल मिनिंग आणि अश्लील अर्थ लपलेले असतात. ही गाणी लय तालात चांगली असली तरी त्याचा समाजावर वाईट परिणाम होऊ शकतो. आतापर्यंत सर्रास अशी गाणी बनवली जायची आणि सार्वजनिक ठिकाणी वाजवली जायची. पण आता त्यावर बंदी येणार आहे. या भोजपुरी गाण्यांसंदर्भात बिहार सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. आता भोजपुरी चित्रपटसृष्टीत दुहेरी अर्थाची आणि अश्लील गाणी बनवणाऱ्यांची खैर नाही. आता अशा आशयाची गाणी बनवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यांच्या या निर्णयाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. बिहारचे विकास मंत्री बिजेंद्र प्रसाद यादव यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. स्वत:ला राष्ट्रपती पदाचे उमेदवार समजणारे बिचुकले यांचा पुण्याच्या निवडणुकीत पराभव, इतक्या मतांवर मानवं लागलं समाधान दुहेरी अर्थ असलेल्या भोजपुरी गाणी आणि अश्लील म्युझिक व्हिडिओंविरोधात बिहार सरकार गंभीर दिसत आहे. अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्री बिजेंद्र प्रसाद यादव यांनी बुधवारी सांगितले. विधानसभेत बोलताना नियोजन आणि विकास मंत्री यादव यांनी ही माहिती देत ते म्हणाले की, पोलिसांना भोजपुरी गाण्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे, ज्यामुळे अनेकदा सामाजिक अशांतता आणि हिंसाचार होतो.अशी गाणी आणि व्हिडीओ बनवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
Bihar: डबल मीनिंग वाले भोजपुरी गानों पर होगा एक्शन, मंत्री बिजेंद्र प्रसाद यादव का बड़ा ऐलान pic.twitter.com/9SKbJe5VON
— Shubham Rai (@shubhamrai80) March 2, 2023
याबद्दलच सीपीआय(एम) आमदार अजय कुमार म्हणाले की मुख्यालयाच्या सूचना असूनही, स्थानिक पोलिस भोजपुरी गाण्यांमधील अश्लीलता आणि दुहेरी एंटरवर कारवाई करत नाहीत…अशा गायक-वादकांवर दंडात्मक कारवाई व्हायला हवी, इथूनपुढे याची अमलबजावणी करण्यात येईल असे ते म्हणाले.
बिहार सरकारने घेतलेल्या या निर्णयाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. भोजपुरी गाणी केवळ बिहार आणि उत्तर भारतच नाही तर इतर अनेक ठिकाणी प्रसिद्ध होतात. या गाण्यांचा अर्थ समजनूं न घेता त्याच्यावर अबालवृद्ध ठेका धरतात. या गाण्यांच्या अर्थाचा समाजमनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्याच्या अर्थामुळे समाजात हिंसा निर्माण होऊ शकते. त्यामुळेच अशा आशयाच्या गाण्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. त्यामुळे बिहार सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक सगळीकडे केलं जात आहे.