जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘40 वर्षांच्या करिअरमध्ये 600 अ‍ॅक्शन सीन’; शरत सस्केनांनी सांगितला 12 सर्जरीचा अनुभव

‘40 वर्षांच्या करिअरमध्ये 600 अ‍ॅक्शन सीन’; शरत सस्केनांनी सांगितला 12 सर्जरीचा अनुभव

‘40 वर्षांच्या करिअरमध्ये 600 अ‍ॅक्शन सीन’; शरत सस्केनांनी सांगितला 12 सर्जरीचा अनुभव

40 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांना तब्बल 12 वेळा रुग्णालयात जाऊन उपचार करावे लागले आहेत. (Sharat Saxena action scene) पाहा कसा होता त्यांचा हा अनुभव…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 2 जुलै**:** शरत सस्केना (Sharat Saxena) हे बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. विनोदी, खलनायक, सहाय्यक अभिनेता, वडील अशा विविध भूमिकांच्या माध्यमातून जवळपास गेली चार दशकं ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. (Sharat Saxena Movie) आज ते यशाच्या शिखरावर आहेत. परंतु हा प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता. गेल्या 40 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांना तब्बल 12 वेळा रुग्णालयात जाऊन उपचार करावे लागले आहेत. (Sharat Saxena action scene) पाहा कसा होता त्यांचा हा अनुभव… सोशल मीडियावर प्रियांकाचीच हवा; एका पोस्टसाठी मिळतं इतक्या कोटींचं मानधन शरत सक्सेना सध्या विद्या बालनच्या शेरनी या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी या चित्रपटात केलेल्या अ‍ॅक्शन सीन्सची सर्वत्र स्तुती होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी PTI ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या करिअरवर भाष्य करताना जखमी अवस्थेत 12 वेळा रुग्णालयात भरती झाल्याचा अनुभव सांगितला. एक वडापाव खाऊन काढायची दिवस’; Article 15 फेम अभिनेत्रीचा संघर्षमय प्रवास ते म्हणाले, “प्रत्येक दिग्दर्शकाला वाटतं की मी त्यांच्या चित्रपटात केवळ अ‍ॅक्शन सीन्स करावे. असं वाटतं माझ्याकडे पाहून त्यांना अ‍ॅक्शन सीन चित्रीत करण्याची इच्छा होते. परंतु हे सीन्स अनेकदा माझ्या अंगाशी येतात. गेल्या 40 वर्षांच्या करिअरमध्ये मी जवळपास 600 अ‍ॅक्शन सीन्स केले आणि 12 वेळा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले आहेत.” शरत सस्केना यांनी आपल्या करिअरमध्ये 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी साकारलेल्या खलनायिकी व्यक्तिरेखा प्रचंड गाजल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात