मुंबई, 30 जून: महाराष्ट्राच्या राजकारणासाठी 'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन' हे शब्द काही नवीन नाहीत. गेली अनेक दिवस हे शब्द लोकांच्या डोक्यात फिट्ट झाले आहेत. मात्र आता कलाकारही 'आम्ही पुन्हा आलो' असं म्हणताना दिसत आहेत. स्टार प्रवाहवरील
( Star Pravah) सुख म्हणजे नक्की काय असतं
( Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेच्या सेट कलाकारांनी आणि संपूर्ण टिमने 'आम्ही पुन्हा आलो' असं म्हणत जंगी सेलिब्रेशन केलं आहे. कलाकार असं का म्हणतं आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं कारणही तितकंच खास आहे कारण मालिका अनेक महिन्यांनंतर टिआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आली. स्टार प्रवाहवरील सगळ्या मालिकांना मागे टाकत सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
प्रेक्षकांसाठी मालिकेत पुढच्या भागात काय दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं असतं. परंतू मालिकेच्या टिमला आणि कलाकारांना मालिकेचा टिआरपी महत्त्वाचा असतो. कारण त्यांनी केलेल्या कामाची पावती त्यांना टिआरपी रेटिंगमधून मिळत असते. या आठवड्याचा टिआरपी रेटिंग चार्ट समोर आला आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका या आठवड्यात 6.8 टिआरपी रेटिंगसह अव्वल ठरली आहे. मागील काही महिन्यात गौर जयदीप यांच्यात आलेला दुरावा काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नव्हता. मालिका टॉप दहा मध्ये नेहमीत 8-9 क्रमांकावर होती. मात्र मागच्या काही आठवड्यात मालिकेत नवा ट्रॅक पाहायला मिळाला. सध्या मालिकेत शिर्केपाटलांच्या खऱ्या वंशावरचं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचं दिसून येतंय.
हेही वाचा -
Marathi Serial: सुख म्हणजे नक्की काय असतं! अरुंधती-दीपाला गौरीची धोबीपछाड; बघा या आठवड्याचा TRP चार्ट
TRPचा निकाल समोर येताच कलाकारांनी सेटवर जंगी सेलिब्रेशन केलं. 'आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो, पुन्हा आलो' असं म्हणत आनंद साजरा केला. अभिनेत्री माधवी निमकरनं हा धम्माल व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कलाकार मालिकेच्या सेटवर आनंदानं नाचताना दिसत आहेत. 'बऱ्याच महिन्यांनी आम्ही नंबर वनवर आलो. आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो, पुन्हा आलो', असं ओरडून ओरडून सांगताना कलाकार दिसत आहेत.
मालिकेला मिळालेल्या या यशाला प्रेक्षकांनी भरभरुन शुभेच्छा दिल्यात. कलाकारांचं आणि टिमचं अभिनंदन करत एका युझरनं म्हटलंय, 'खूप आनंद झाला. किती दिवस मालिका नंबर वन यावी यासाठी आम्ही वाट पाहत होतो'. तर अनेकांनी 'हार्ट' इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केलं आहे.
मागील 2 महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर असलेली 'रंग माझा वेगळा' ही मालिका या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 'आई कुठे काय करते' मालिका या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर 'फुलाला सुगंध मातीचा' आणि पाचव्या क्रमांकावर 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.