Home /News /entertainment /

IPS कीर्तीवर आली ट्रॅफिक हवालदार होण्याची वेळ; असं काय झालं की जीजीआक्का मागणार भररस्त्यात माफी

IPS कीर्तीवर आली ट्रॅफिक हवालदार होण्याची वेळ; असं काय झालं की जीजीआक्का मागणार भररस्त्यात माफी

IPS कीर्तीवर आली ट्रॅफिक हवालदार होण्याची वेळ; असं काय झालं की जीजीआक्का मागणार भररस्त्यात माफी

IPS कीर्तीवर आली ट्रॅफिक हवालदार होण्याची वेळ; असं काय झालं की जीजीआक्का मागणार भररस्त्यात माफी

मोठ्या कष्टानं आयपीएस झालेल्या कीर्तीवर आता वाहतूक विभागात शिक्षा भोगण्याची वेळ आली आहे. असं काय झालं कीर्तीबरोबर? जाणून घ्या.

  मुंबई, 16 जून:  घरच्या जबाबदाऱ्या आणि खडतर प्रशिक्षणाची कसोटी पार करत कीर्तींचं IPS ( Kirti) होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. अनेक परीक्षा पार पाडत कीर्तीनं तिचं आणि तिच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.  ट्रेनिंग पूर्ण करून कीर्ती पुन्हा घरी आली. आयपीएस होण्यासाठी कीर्तीनं किती मेहनत घेतली हे आपण पाहिलंच आहे. कीर्तीसाठी तिच काम म्हणजे तिचा देव आहे. पण घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून काम करण कीर्तीसाठी मोठा टास्क आहे. असं असलं तरी कीर्तीनं हार न मानता काम सुरू ठेवलं आहे. मात्र आयपीएस कीर्तीवर आता ट्रॅफिक हवालदार होण्याची वेळ आली आहे.  मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टनं  सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. फुलाला सुगंध मातीचा ( Phulala Sugandh Maticha) मालिकेच्या येत्या भागात आपण आहोत, आयपीएस कीर्तीची वाहतूक विभागात बदली होणार आहे.  कीर्ती ऑन ड्यूटीवर असताना जीजी आक्का तिला पाहताता. रखरखत्या उन्हात रस्त्यावर कीर्तीला ड्यूटी करत असताना पाहून जीजी आक्का तिची चौकशी करतात. तुझी कुठल्या विभागात बदली झाली आहे, असं विचारतात. तेव्हा कीर्ती त्यांना वाहतूक विभागात बदली झाल्याचं सांगते. त्यानंतर  आमच्यामुळे तुला ही शिक्षा मिळाली असं म्हणत जीजी आक्का कीर्तीची भर रस्त्यात हात जोडून माफी मागतात.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  जामखेडकर कुटुंबानं असं काय केलं की आयपीएस कीर्तीला रस्त्यावर उभं राहून वाहतूक पोलिसांची ड्यूटी करावी लागली? असा प्रश्न समोर आला आहे. हेही वाचा - TRP ALERT! मालिकेत ट्विस्ट आणूनही TRPच्या शर्यतीत इंद्रा-दीपू दहाव्या क्रमांकावरच, नेहा-यशचेही तेच हाल आपल्या हिंमतीच्या जोरावर आयपीएस झालेल्या कीर्तीला आयपीएस होताच शिक्षा का भोगावी लागली? कीर्तीची ही शिक्षा तिच्या स्वप्नांवर पाणी फिरवणार का? तसेच शुभमला हे कळल्यावर तो काय प्रतिक्रीया देणार ? हे पाहण्यासाठी मालिकेचे येणारे भाग पाहणं महत्त्वाचं ठरेल. फुलाला सुगंध मातीचा मालिकेत नुकतीच कीर्तीची वटपौर्णिमा साजरी झाली. शुभममुळे कीर्तीचं आयपीएस होण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानं कीर्तीसाठी ही वटपौर्णिमा फार खास होती. मोठ्या उत्साहानं कीर्ती शुभम ही वटपौर्णिमा साजरी करताना दिसले.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: IPS Officer, Marathi actress, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या