मुंबई 3 मे : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनी वरील लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahakutumb Sahaparivar) मालिकेत सध्या पश्या (Pashya) आणि अंजीचा (Anji) रोमान्स (Pashya Anji romance) पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. सध्या मालिकेतील अंजी आणि पश्याची चांगलीच चर्चा होत आहे. मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे, तर यात पश्या आणि अंजीचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. नव्या भागात अंजी-पश्याला दिलेलं वचन पूर्ण करताना दिसतेय, चेहऱ्यावर साबणाचा फेस लावून डोळे बंद असलेल्या पश्याला अंजीने विहिरीवरच किस केलं आहे. तर त्यानंतर ती तेथून लाजून पळून जाते. पश्या मात्र हे सगळं पाहून तसाच पुतळ्यासारखा स्तब्ध राहतो.
तेव्हा आता पश्या आणि अंजीची ही प्रेमळ लव्हस्टोरी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मोरे कुटुंबाची ही कथा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना फारच भावली होती.
या मालिकेतील अनेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. यापैकीच या मालिकेतील प्रसिध्द जोडी अंजी-पश्या यांचा तर खुप मोठा चाहतावर्ग आहे.
‘अग्गबाई सुनबाई’मध्ये मोठा ट्विस्ट; शुभ्राच्या आयुष्यात येणार नवा व्यक्तीअभिनेत्री कोमल कुंभार (Komal Kumbhar) ही अंजीची भूमिका साकारत आहे तर अभिनेता आकाश नलावडे (Akash Nalawade) पश्याची भूमिका साकरत आहे. याशिवाय अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) , नंदीता पाटकर (Nnadirta Patkar), किशोरी अंबिये (Kishori Ambiye) , अमेय बर्वे, दिगंबर नाईक, साक्षी महेश (Sakshi Mahesh) आदी कलाकारही मालिकेत व्यक्तिरेखा साकारत आहेत.