सुशांत सिंग राजपूतला जाऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली असली तरी असा एकही दिवस जात नाही जेव्हा त्याची उणीव कोणत्या चाहत्यांना भासत नाही.
सुशांतने मोजक्या पण दर्जेदार चित्रपटातून काम केलं. पण असेसुद्धा काही चित्रपट होते जे त्याने नाकारले होते असं आजही म्हटलं जातं.
सुशांतने संजय लीला भन्साळीच्या तीन चित्रपटांना नकार दिला होता. मुंबई पोलिसांनी जेव्हा संजय यांची चौकशी केली त्यातून ही माहिती समजली. सुशांतने गोलियों की रासलीला- रामलीला चित्रपटाला नकार दिला होता.
संजय भन्साळींच्या पद्मावत चित्रपटासाठी सुद्धा त्याला विचारणा झाली होती. मात्र हे तीनही चित्रपट तारखा उपलब्ध नसल्याने त्याने नाकारले असं सांगितलं जातं.
श्रीराम राघवन यांच्या नजरेत अंधाधुन चित्रपटासाठी सुशांतचं नाव होतं अशी अफवा सुद्धा पसरली होती. पण गोष्टी प्लॅनिंग नुसार न घडल्याने नंतर हा रोल आयुष्यमान खुरानाच्या नशिबात आला असं सांगितलं जातं.
कबीर सिंग या चित्रपटासाठी सुद्धा अर्जुन कपूर आणि सुशांत सिंग राजपूत अशी दोन नाव मेकर्सच्या डोळ्यापुढे होती. पण दोघांनीही तो रोल नाकारल्याने यासाठी शाहिदची वर्णी लागली
अनुराग कश्यपच्या सांगण्यानुसार त्याने हसी तो फसी चित्रपटासाठी सुशांतला विचारणा केली होती. पण YRF शी असलेल्या करारामुळे त्याला ह्या फिल्मला नाही म्हणावं लागलं. पुढे यात सिद्धार्थ मल्होत्राचं कास्टिंग झालं.
अनुरागच्या सांगण्यानुसार त्याने 2016 मध्ये पुन्हा सुशांतला मुक्कबाज चित्रपटाच्या भूमिकेसाठी विचारणा केली होती. मात्र एम एस धोनीच्या यशानंतर त्याने कधीच कॉल उचलले नाहीत असं अनुरागने स्पष्ट केलं.
फितूर या चित्रपटात सुद्धा पहिला चॉईस सुशांतच होता. मात्र या फिल्मला बराच उशीर होत गेला आणि त्याने ही फिल्म सोडली असं म्हणतात.
2015 मध्ये चेतन भगत यांनी त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट केलेलं की त्यांच्या हाफ गर्लफ्रेंड पुस्तकावर आधारित चित्रपटात सुशांत मुख्य भूमिकेत असेल. पुढे काही कारणांमुळे अर्जुनने सुशांतला रिप्लेस केलं.