मुंबई, 11 ऑक्टोबर: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येप्रकरणी सीबीआयची चौकशी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या केसशी संबंधित असणाऱ्या सर्वांना (CBI)सीबीआयकडून चौकशीसाठी बोलवलं जात आहे. रिया चक्रवर्तीची शेजारीण डिंपल थवानीने बदललेल्या जबाबामुळे तपासाला एक वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे. सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी एक दिवस, म्हणजे 13 जूनला रियाला आणि सुशांतला एकत्र पाहिलं होतं. असं डिंपल म्हणाली होती. पण तिने स्वत:चा जबाब बदलला असल्याचं उघडकीस आलं आहे.
सीबीआय टीमने डिंपल थलावीची चौकशी केली. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी एक दिवस सुशांत आणि रियाला एकत्र पाहिले का? असा सवाल जेव्हा सीबीआयने डिंपलला विचारला तेव्हा तिने असं काहीच पाहिलं नसल्याचं सांगितलं. रिया आणि सुशांत आत्महत्येपूर्वी भेटले होते, असं मी कोणाकडून तरी ऐकलं होतं. असा जबाब तिने दिला आहे.
डिंपलला सीबीआयने काय प्रश्न विचारले?
सीबीआय - सुशांत रियाला ड्रॉप करायला आला आहे हे तुम्ही बघितलं होतं का?
डिंपल - नाही. मी नाही कोणतरी दुसऱ्याने पाहिलं होतं.
सीबीआय - दुसऱ्या कोणीतरी? म्हणजे नक्की कोणी पाहिलं होतं? मग ती व्यक्ती समोर का येत नाही?
डिंपल - ते मला माहित नाही.
सीबीआय - त्या व्यक्तीने सुशांत आणि रियाला एकत्र केव्हा पाहिलं होतं?
डिंपल - मला माहित नाही.
डिंपलच्या या यूटर्न नंतर सीबीआयने डिंपलला इशारा दिला आहे की, "यापुढे तुला स्वत:ला जे माहित असेल तेच बोलत जा. जे तू पाहिलेलं नाहीस त्या गोष्टी पसरवू नकोस". सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी बांद्र्याच्या राहत्या घरामध्ये आत्महत्या केली होती. गेले 4 महिने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पण अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. काही दिवसांपूर्वी या तपासामध्ये ड्रग कनेक्शनही समोर आलं होतं. यामध्ये बड्या अभिनेत्री आणि ड्रग पेडलर्सचीही चौकशी करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, CBI, Sushant singh raajpoot