मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sridevi Death Anniversary: दुबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये श्रीदेवी यांची ती रात्र ठरली शेवटची, वाचा नेमकं काय घडलं होतं?

Sridevi Death Anniversary: दुबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये श्रीदेवी यांची ती रात्र ठरली शेवटची, वाचा नेमकं काय घडलं होतं?

श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे, याविषयी अनेक तर्कवितर्क मांडले गेले. त्यांची हत्या झाल्याचं काही जणांनी म्हटलं तर हार्ट अ‍ॅटॅकमुळे मृत्यू झाला  असं सांगण्यात आलं.

श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे, याविषयी अनेक तर्कवितर्क मांडले गेले. त्यांची हत्या झाल्याचं काही जणांनी म्हटलं तर हार्ट अ‍ॅटॅकमुळे मृत्यू झाला असं सांगण्यात आलं.

श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे, याविषयी अनेक तर्कवितर्क मांडले गेले. त्यांची हत्या झाल्याचं काही जणांनी म्हटलं तर हार्ट अ‍ॅटॅकमुळे मृत्यू झाला असं सांगण्यात आलं.

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी: सदमा, मिस्टर इंडिया, खुदा गवाह, चालबाज, चांदनी यासारख्या बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण साकारात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, अभिनय आणि नृत्य कौशल्याचा मिलाफ असलेली चित्रपटसृष्टीतली पहिली महिला सुपरस्टार (Female Superstar) म्हणून अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची ओळख आहे. श्रीदेवी यांची आज (गुरुवारी, 24 फेब्रुवारी 22) पुण्यतिथी (Death Anniversary) आहे. निधनानंतरही श्रीदेवीचा बहारदार अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. श्रीदेवी यांचा वयाच्या 54 व्या वर्षी मृत्यू झाला. एका विवाह सोहळ्यासाठी श्रीदेवी दुबईला (Dubai) गेल्या असताना तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे, याविषयी अनेक तर्कवितर्क मांडले गेले. त्यांची हत्या झाल्याचं काही जणांनी म्हटलं तर हार्ट अ‍ॅटॅकमुळे मृत्यू झाला  असं सांगण्यात आलं.

श्रीदेवी म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते सौंदर्य आणि अजरामर भूमिका. दमदार अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळे आजही श्रीदेवी यांची लोकप्रियता कायम आहे. श्रीदेवी भाचा मोहित मारवाह याच्या विवाह सोहळ्यासाठी दुबईमध्ये गेल्या होत्या. मात्र याचदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, श्रीदेवींचा मृत्यू हार्ट अ‍ॅटॅकमुळे (Heart Attack) झाल्याचं सांगण्यात आल. मात्र शवविच्छेदनानंतर बाथटबमधील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र तत्पूर्वी त्यांच्या मृत्यूच्या कारणांबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात आले होते. श्रीदेवी यांची हत्या झाल्याचं काही जणांनी म्हटलं तर काहींनी हार्ट अ‍ॅटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं.

हे वाचा-मुंबई उच्च न्यायालयाकडून अमिताभ बच्चन यांना मोठा दिलासा,काय आहे BMC VS BIG B वाद

मोहित मारवाहचा विवाह सोहळा (Wedding Ceremony) पार पडल्यानंतर श्रीदेवीचे पती आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर (Boney Kapoor) त्यांच्या मुलींसह मुंबईत परतले. श्रीदेवी यांनी मात्र दुबईतच काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला होता. घटनेच्या दिवशी श्रीदेवी यांनी बहुतांश वेळ खोलीतच विश्रांती घेत घालवला. त्यादिवशी श्रीदेवी यांची चौकशी करण्यासाठी बोनी कपूर यांनी त्यांना फोन केला होता. या संवादादरम्यान आपण दुबईला परत येणार असल्याचं बोनी कपूर यांनी त्यांना सांगितलं नव्हतं. पत्नीला सरप्राईज देण्यासाठी ते दुबईत परतले. त्यादिवशी त्यांनी डिनर एकत्र करण्याचं ठरवलं आणि एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यानंतर बोनी कपूर फ्रेश होण्यासाठी गेले. ते फ्रेश होऊन येताच श्रीदेवी डिनरला जाण्याकरता तयार होण्यासाठी गेल्या. यावेळी बोनी कपूर दक्षिण आफ्रिका आणि भारतादरम्यान सुरु असलेल्या क्रिकेट मॅचचे अपडेट पाहत होते.

हे वाचा-सारा-जान्हवीसह भूमी होती सुकेशच्या निशाण्यावर, ED तपासातून स्पष्ट

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बोनी यांनी श्रीदेवी यांना लिव्हिंग रूममधून आवाज दिला. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने ते चिंताग्रस्त झाले. आतून पाण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला. पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. बोनी कपूर यांनी जोरदार धक्का देत दरवाजा उघडला असता बाथटब पाण्याने पूर्ण भरला होता आणि श्रीदेवी त्यात बुडाल्या होत्या. हे दृश्य पाहताच बोनी कपूर यांना जबर मानसिक धक्का बसला असं त्यावेळी माध्यमांनी सांगितलं होतं.

आजही श्रीदेवीचे चित्रपट, त्यातील तिचा अभिनय, नृत्य प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. एका चतुरस्त्र अभिनेत्रीला (Actress) गमावल्याची भावना आजही तिच्या फॅन्स मनात कायम आहे.

First published:

Tags: Sridevi, Sridevi death anniversary