'सुर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात स्पृहा निवेदक होती. तिच्याबरोबर हर्षद नायबळने धम्माल उडवून दिली होती.
फार कमी वयात हर्षदने त्याच्या गोड बोबड्या स्वरात गायलेली गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करुन गेली.
सुर नवा ध्यास नवाचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत असून औरंगाबादमध्ये ऑडिशन प्रक्रिया सुरू आहे. हर्षद देखील औरंगाबदचा असल्याने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
मालिकेच्या सेटवरही हर्षदची मज्जा मस्ती सुरू असते. त्याच्या सोशल मीडियावरुन तो अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असतो.