मुंबई, 28 जुलै : शेफ बनण्याचं स्वप्न घेऊन आलेला धनुष भावाच्या सांगण्यावरून सिनेक्षेत्रात आला आणि मेहनतीनं साऊथचा एक प्रसिद्ध अभिनेता झाला. धनुषनं साऊथ सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. धनुष आज त्याचा 40वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं धनुषचा स्ट्रगल काळ कसा होता याविषयी जाणून घेऊया. धनुष हा आता ग्लोबल स्टार झाला आहे. पण एक काळ असा होता जेव्हा धनुषला सिनेमाच्या सेटवर ऑटो ड्राइव्हर म्हणून हाक मारली जायची. अनेक जण त्याची खिल्ली उडवायचे. पण धनुषनं त्याच्या मेहनतीनं आणि चिकाटीनं साऊथ सिनेमासृष्टीवर आपली छाप सोडली. धनुषचं पूर्ण नाव व्यंकटेश प्रभु कस्तुरी राजा. धनुषला सुरूवातीच्या काळात ऑटो ड्रायव्हर म्हणून चिडवायचे. धनुषनं स्वत: याचा खुलासा केला होता. अभिनेता विजय सेतुपतीबरोबर गप्पा मारत असताना त्यानं सांगितलं की, 2003मध्ये कादल कोंडन सिनेमाचं शुटींग सुरू होतं. तेव्हा सेटवर मला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. लोक मला टॅक्सी ड्राइव्हर म्हणून हसत होते. त्या सिनेमाच्या सेटवर माझ्याबरोबर अनेकदा बॉडी शेमिंग झालं. हेही वाचा - ‘या’ 6 अभिनेत्रींने सनी देओलसोबत काम करायला दिला नकार, चौघींनी तर ‘गदर’ सिनेमाची नाकरली होती ऑफर अनेकांना ही गोष्टी माहिती नसेल पण धनुषला शेफ व्हायचं होतं. त्याला जेवण बनवायला प्रचंड आवडतं. अभिनय क्षेत्रात येण्याचा त्याचा विचारही नव्हता. इंडस्ट्रीत येण्याआधी धनुष हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेऊ इच्छित होता. पण त्याचा जन्मच साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरात झाल्याने तो फिरून फिरून सिनेसृष्टीतच आला. 2002मध्ये धनुषने वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या थुल्लुवाघो इलमई या सिनेमातून पदार्पण केलं.
केवळ साऊथ सिनेसृष्टीत नाही तर धनुषनं बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये देखील आपली छाप सोडली. द ग्रे मॅन या सिनेमातून धनुषनं हॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमासाठी त्याचं प्रचंड कौतुक करण्यात आलं. तर 2013 मध्ये आलेल्या रांझना या सिनेमातून धनुष बॉलिवूडमध्ये झळकला. या सिनेमालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.