मुंबई, 1 ऑक्टोबर : 30 सप्टेंबर 2022 रोजी दिल्ली येथे 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण झालं. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व विजेत्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं. यावेळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुर्या शिवकुमार
लाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे ‘सूरराई पोतरू’ या चित्रपटाला पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सूर्याच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली भावना व्यक्त केलेली पहायला मिळाली. दक्षिण स्टार सूर्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. याच कारणही तसंच आहे. सूर्याच्या ‘सूरराई पोतरू’ या चित्रपटाला पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. हा चित्रपट अभिनेता सुर्या आणि त्याची पत्नी ज्योतिका यांच्या होम बॅनरखाली बनवला आहे. सूर्याला सूरराई पोत्रू या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी या वेगवेगळ्या श्रेणींमध्येही पुरस्कार मिळाला. यावेळी सूर्याती पत्नी खूप आनंदी आणि अभिमानास्पद दिसत होती.
सूर्याची पत्नी ज्योतिकानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील काही फोटो शेअर केले. या फोटोला तिनं दोन शब्दांचं कॅप्शन दिलं. ‘अभिमान आणि धन्य’. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्योतिकानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती, सूर्या आणि मुले देव आणि दिया दिसत आहेत. या आनंदाच्या क्षणी संपूर्ण कुटुंबच एकत्र होतं. हेही वाचा - 68th National Film Awards : अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान दरम्यान, ‘सूरराई पोतरू’ या चित्रपटात सुर्याशिवाय अभिनेत्री अपर्णा बालमुरली मुख्य भूमिकेत होती. स्वत:च्या एअरलाइनचे स्वप्न पाहणाऱ्या नेदुमारन राजसंगमची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, पण त्याने हार मानली नाही आणि आपले स्वप्न पूर्ण केले.