मुंबई, 4 नोव्हेंबर- आज सर्वत्र दिवाळीची (Diwali 2021) धामधूम पाहायला मिळत आहे. आजूबाजूला सुंदर सेलेब्रेशन सुरु आहे. पूर्वी प्री-दिवाळी सेलिब्रेशन सेलिब्रिटींच्या घरात ठेवले जात होते. ज्यामध्ये बॉलिवूडपासून दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीची धूम पाहायला मिळायची. मात्र कोरोना परिस्थितीमुळे गेली २ वर्षे यावर ग्रहण लागलं होतं. दरम्यान, आता दक्षिणेतील (South Star) अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि अल्लू अर्जुन यांनी कुटुंबासोबत प्री-दिवाळी सेलिब्रेशन केलं आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे दोन्ही स्टार्स खूप एन्जॉय करताना दिसून येत आहेत.
View this post on Instagram
अभिनेता चिरंजीवीचा मुलगा आणि साऊथ सुपरस्टार राम चरण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो अनेकदा स्वत:शी संबंधित पोस्ट शेअर करून चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असतो. अशा परिस्थितीत त्याने इंस्टाग्रामवर प्री-दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो कुटुंबासोबत पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे.फोटो शेअर करण्यासोबतच राम चरणने 'हॅपी दिवाळी' असं कॅप्शनही लिहिलं आहे. त्यांनी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच अभिनेत्याला मुंबईत स्पॉट करण्यात आलं होत. त्याने त्याच्या आगामी 'RC15' या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केलं आहे. याचे दिग्दर्शन चित्रपट निर्माता शंकर करत आहेत. चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे.
RRR चित्रपटामुळे रामचरण चर्चेत-
याशिवाय राम चरण 'RRR' या चित्रपटामुळेही खूप चर्चेत आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. चित्रपटाचं दिग्दर्शिन एसएस राजामौली करत आहेत. 'बाहुबली 2' नंतर राजामौलीचा हा दुसरा मोठा चित्रपट आहे. रामचरणसोबत यामध्ये अजय देवगण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट्ट हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
(हे वाचा:यामी गौतम पतीसोबत नव्या घरात साजरी करणार लग्नानंतरची पहिली दिवाळी)
पुनीत राजकुमारच्या आठवणी केल्या होत्या शेअर-
चित्रपटांव्यतिरिक्त राम चरणबद्दल बोलायचे झाले तर तो नुकताच पुनीत राजकुमारच्या घरी पोहोचला होता. आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शोक व्यक्त केला होता. यादरम्यान त्याने अभिनेत्याच्या मोठ्या भावाचीही भेट घेतली. मीडियाशी बोलताना अभिनेत्यानं म्हटलं होतं की, 'पुनीत गारु (सर ) खूप गोड व्यक्ती होते. मी त्यांना भेटलो होतो. तो माझ्या घरी आले होते. त्यांना सर्वांच भरभरून प्रेम मिळालं होतं. पुनीत गारु, तुम्ही कुठेही असाल, आम्हाला तुमची आठवण येईल'. असं म्हणत अभिनेत्याने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, South indian actor