Home /News /entertainment /

अभिनेत्रीने शाळेच्या वॉचमन काकांसोबत केला डान्स; काही क्षणात VIDEO झाला VIRAL

अभिनेत्रीने शाळेच्या वॉचमन काकांसोबत केला डान्स; काही क्षणात VIDEO झाला VIRAL

शाळेतल्या वॉचमन काकांबरोबर तिची चांगलीच गट्टी जमली आहे. त्यांच्याकडून खूप सकारात्मकता शिकता आली असं तिनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सांगितलं आहे.

  हैदराबाद, 24 फेब्रुवारी: दक्षिणात्य अभिनेत्री निक्की गलराणी (Nikki Galrani) सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यावेळी तिने चित्रीकरणाच्या ठिकाणावरून एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यावेळी निक्की एका शाळेत चित्रपटाचं चित्रीकरण (Film Shooting in school) करत होती. या शाळेतील वॉचमनसोबत तिची चांगलीच गट्टी जमली आहे. त्यांच्याकडून खूप सकारात्मकता शिकता आली असं तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सांगितलं आहे. शाळेच्या या वॉचमनला भेटून तिला खूपच आनंद झाल्याचं तिने सांगितलं. तिने या वॉचमनसोबत (Nikki dances with watchman) डान्स केला आहे. तसंच या वॉचमननेही तिला डान्सचे धडे दिले आहेत. त्यांच्या या मजेदार डान्सचा व्हिडीओ निक्कीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी तिने कॅप्शनमध्ये काही सकारात्मक ओळीही लिहिल्या आहेत. यावेळी निक्कीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आयुष्यात आपण तसा आनंद नेहमीच साजरा करू शकत नाही, जसा आपण विचार केलेला असतो. पण सध्या आम्ही येथे आहोत, तर डान्स पार्टी तर करूच शकतो." या व्हिडीओत, अभिनेत्री या शाळेच्या वॉचमनसोबत मजेदार डान्स करताना दिसते. यावेळी ती या वॉचमनच्या मजेदार डान्सिंग स्टेप्सची नक्कल करताना दिसतेय. तर वॉचमन देखील तिला डान्सच्या स्टेप्स शिकवताना दिसतोय. त्यांच्या या निरागस डान्सच्या व्हिडीओचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

  (वाचा - ‘फास्टर फेणे’च्या दिग्दर्शकाचा नवा प्रयोग;आता थिएटर होणार ‘झोंबीमय’, पाहा TEASER)

  (वाचा - एक प्लेट भेळपुरीसाठी 8 जणांमध्ये युद्ध; रिचानं शेअर केला थक्क करणारा VIDEO) निक्की गलराणी लवकरच दिग्दर्शक राम बालाच्या 'इडियट' आणि दिग्दर्शक Kathirvelu यांच्या 'राजवंशम्' या चित्रपटात झळकणार आहे. अलीकडेच निक्कीने अभिनय क्षेत्रात सात वर्ष पूर्ण केली आहेत. निक्कीने '1983' या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या 7 वर्षांच्या कालावधीत तिने मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा विविध भाषांमध्ये सुमारे 30 चित्रपट केले आहेत. तसंच तिने 'डार्लिंग' चित्रपटात धमाकेदार भूमिका साकारली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गाजला होता. या चित्रपटासाठी निक्कीला 'सर्वोत्कृष्ट डेब्यू' अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Entertainment, Instagram post, Nikki galrani, South actress, Tollywood, Viral video., Viral videos

  पुढील बातम्या