मुंबई, 7 जानेवारी- नवीन वर्षात सध्या मनोरंजन सृष्टीत लग्नाचं वारं वाहात आहे. मराठी कलाकार असो किंवा बॉलिवूड अनेक जोडपे लग्न बंधनात अडकणार असल्याचे वृत्त दररोज समोर येत आहेत. आजही असंच एका कलाकारबाबत वृत्त समोर आलं आहे. परंतु या अभिनेत्याची स्टोरी थोडी हटके आहे. याला कारणही तसंच आहे. लवकरच एक कन्नड अभिनेता चौथ्यांदा लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे अभिनेत्याचा लीप लॉकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या तिसऱ्या पत्नीने आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे.
प्रसिद्ध कन्नड अभिनेते नरेश बाबू लवकरच चौथ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. नरेश बाबू हे साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे सावत्र भाऊ आहेत. वयाच्या 58 व्या वर्षी ते पुन्हा बोहल्यावर चढणार आहेत. आपल्या लेडी लव्ह पवित्रा लोकेशसोबत त्यांनी लग्न करत असल्याचं जाहीर केलंय. आपल्या लग्नाची माहिती देत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये ते आपली होणारी चौथी पत्नी पवित्रा लोकेशला लिपलॉक करतांना दिसून आले होते. त्यांचा हा फोटो समोर येताच विविध प्रतिक्रिया मोर येत आहेत. दरम्यान त्यांची तिसरी पत्नी ही पोस्ट पाहून भडकल्याचं म्हटलं जात आहे.
अभिनेते नरेश बाबू यांनी राम्या रघुपती यांच्यासोबत लग्न केलं होतं. राम्या या त्यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. राम्या आधीही नरेश बाबू यांनी दोन लग्न केली आहेत. आता हे अभिनेते आपल्या चौथ्या लग्नाच्या तयारीत आहेत. मात्र यामध्ये त्यांची तिसरी पत्नी राम्या आक्षेप घेत आहे. ५८ वर्षाच्या नरेश बाबू यांनी आपल्या लेडी लव्ह पवित्रासोबत लीपलॉक करत व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून राम्या प्रचंड भडकली असून कोणत्याही परिस्थितीत आपण हे लग्न होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
New Year ✨ New Beginnings 💖 Need all your blessings 🙏
From us to all of you #HappyNewYear ❤️ - Mee #PavitraNaresh pic.twitter.com/JiEbWY4qTQ — H.E Dr Naresh VK actor (@ItsActorNaresh) December 31, 2022
व्हायरल व्हिडीओ-
नरेश बाबू आणि पवित्रा लोकेश यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडोओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्याची ओझरती झलक दाखवत असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये नरेश आणि पवित्रा एकमकांसोबत पार्टी करताना, केक कट करताना, नवीन वर्षाचा स्वागत करताना आणि एकमेकांना लिपलॉक करताना दिसून येत आहेत. तसेच व्हिडीओच्या शेवटी नरेश यांनी लवकरच लग्न होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हा व्हिडीओ समोर येताच तिसरी पत्नी राम्या यांनी संताप व्यक्त केल्याचं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, राम्या यांनी म्हटलं आहे, 'कोणी व्यक्ती इतक्या खालच्या पातळीवर कसं जाऊ शकतं. त्यांनी तीन लग्न केली आहेत. आमचा एक मुलगादेखील आहे. आमचा अजून घटस्फोटसुद्धा झालेला नाहीय. ते पुन्हा लग्न कसं करु शकतात. मी हे कधीच होऊ देणार नाही'. असं म्हणत त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Lokmat news 18, Tamil actor