मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Sooryavanshi' BOX OFFICE: रिलीजच्या 11 व्या दिवशीही झाला पैशांचा पाऊस; चित्रपटाने केली तब्बल इतकी कमाई

'Sooryavanshi' BOX OFFICE: रिलीजच्या 11 व्या दिवशीही झाला पैशांचा पाऊस; चित्रपटाने केली तब्बल इतकी कमाई

Ranveer Singh

Ranveer Singh

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपट कोरोनामुळे बराच काळ रिलीजसाठी अडकला होता. अखेर या दिवाळीत रोहित शेट्टीने चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आणि हा चित्रपट ५ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून 'सूर्यवंशी'ने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) आपला दबदबा कायम ठेवला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 17 नोव्हेंबर- अक्षय कुमार  (Akshay Kumar)  आणि कतरिना कैफचा  (Katrina Kaif)  'सूर्यवंशी'  (Sooryavanshi)  चित्रपट कोरोनामुळे बराच काळ रिलीजसाठी अडकला होता. अखेर या दिवाळीत रोहित शेट्टीने चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आणि हा चित्रपट ५ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून 'सूर्यवंशी'ने बॉक्स ऑफिसवर  (Box Office Collection) आपला दबदबा कायम ठेवला आहे.

अल्पावधीतच 'सूर्यवंशी'ने कमाईच्या बाबतीत 150 कोटींचा टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे. त्याचवेळी या चित्रपटाने रिलीजच्या 11व्या दिवशीही पैशांचा पाऊस पाडला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करून या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. तरण आदर्शच्या म्हणण्यानुसार, 'सूर्यवंशी'ने 11व्या दिवशी एकूण 4.50 कोटींची कमाई केली आहे. आणि यासोबतच चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 155.73 कोटींवर पोहोचले आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो, की 'सूर्यवंशी' हा अक्षय कुमारच्या करिअरमधील 15 वा चित्रपट आहे, ज्याने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अक्षयच्या या यशाबद्दल चाहते अक्षयचे मनापासून अभिनंदन करत आहेत. या पोस्टवर अक्षयचे चाहतेही जोरदार कमेंट करत शुभेच्छा देत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीरचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अक्षय मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे.चित्रपट समीक्षकाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'अक्षय कुमार: हे यशाचे स्मित आहे...' 'सूर्यवंशी'चं मोठं यश त्याच्यासाठी आनंद घेऊन आला आहे. यावरून अक्षय कुमारचे सुपरस्टारडम सिद्ध होते. 'सूर्यवंशी' हा त्याच्या कारकिर्दीतील 15 वा चित्रपट आहे, ज्याने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. हे मोठे यश आहे.

अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' आंतरराष्ट्रीय स्तरावर 66 देशांमध्ये 1300 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या देशांमध्ये उत्तर अमेरिका, यूएई, ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन सारख्या इतर अनेक देशांचा समावेश आहे. हा एक विक्रम आहे. 'सूर्यवंशी' भारतात 4 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. यासाठी, निर्मात्यांनी देशातील तीन प्रमुख मल्टिप्लेक्स - पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिससह करारानंतर चित्रपट प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांच्याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंग यांचाही मोठा कॅमिओ आहे. जे प्रेक्षकांना पूर्ण मनोरंजनाचा डोस देत आहे. अक्षय कुमार अजय आणि रणवीरसोबत अॅक्शन करताना दिसत आहे.

(हे वाचा:Sooryavanshi Box Office Collection Day 1: अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी ... )

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी आता चित्रपट ओटीटीकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्सशी हातमिळवणी केल्याचे वृत्त आहे. 'सूर्यवंशी'च्या ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्सशी तगडा करार केला आहे.

First published:

Tags: Akshay Kumar, Entertainment, Katrina kaif, Rohit Shetty