Home /News /entertainment /

'आई माझी काळूबाई' मालिकेत नवा ट्विस्ट; पाटलांना मिळणार वारस

'आई माझी काळूबाई' मालिकेत नवा ट्विस्ट; पाटलांना मिळणार वारस

आर्या (Aarya) आणि अमोघ (Amogh) आता आईबाबा होणार आहेत. तेव्हा ज्या आर्याला पाटलांना घराबाहेर घालवायचं होतं ती आता पाटलांना वारस देणार आहे. त्यामुळे आता मालिका पुढे नक्की काय वळण घेणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

  मुंबई 16 मे : सोनी मराठी (Sony Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘आई माझी काळूबाई’ (Aai Mazi Kalubai) गेले काही दिवस बंद होती. पण आता येत्या सोमवार पासून म्हणजेच 17 मे पासून मालिका पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर आता मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळणार आहे. आर्या (Aarya) आणि अमोघ (Amogh) आता आई-बाबा होणार आहेत. तेव्हा ज्या आर्याला पाटलांना घराबाहेर घालवायचं होतं ती आता पाटलांना वारस देणार आहे. त्यामुळे आता मालिका पुढे नक्की काय वळण घेणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
  सोनी मराठी वाहिनीने मालिकेचा नवी प्रोमो जाहीर केला आहे. तर आता प्रेक्षकांना नव्या एपिसोड्सची प्रतिक्षा आहे. आधीच्या एपिसोड्समध्ये आपण पाहिलत विराट हा आर्या आणि अमोघच्या प्रेमात तसेच घरच्यावंर संकटं आणण्याचे अनेक प्रयत्न करत होता. तर आता ही तो आर्या विरोधात नवी चाल खेळत आहे.
  त्यामुळे आर्या आणि अमोघच्या बाळाला काही धोका तर निर्माण होणार नाही ना हे येणाऱ्या भागांतच स्पष्ट होईल. याशिवाय आई काळूबाई आर्याला कशाप्रकारे शक्ती देते हे ही पाहणं रंजक ठरेल.

  आणखी एक दरवाजा झाला बंद; मुंबई, गोवा नंतर ओडिसामध्येही शूटिंगची परवानगी रद्द

  लॉकडाउनमुळे साताऱ्यातील मालिकेचं शुटींग हे बंद करण्यात आलं होतं. तर मालिकेचं संपूर्ण चित्रिकरण हे गोव्यात हलवण्यात आलं होत. पण आता तिकडेही चित्रिकरणावर बंदी घालण्यात आली आहे. व सगळे कलाकार महाराष्ट्रात परतले आहेत. पण 17 मे पासून मालिकेचे नवे एपिसोड्स सुरू होणार आहेत.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi entertainment, Sony tv

  पुढील बातम्या