मुंबई, 22 सप्टेंबर 2021 ; सोनी मराठी वाहिनीवर ‘ज्ञानेश्वर माउली’ (Dnyaneshwar Mauli) ही नवी मालिका 27 सप्टेंबरपासून संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींची चरित्रगाथा या मालिकेतून उलगडली जाणार आहे. या मालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. सध्या सगळीकडे या मालिकेची चर्चा आहे. यासोबत ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेच्या शीर्षकगीताची **(Dnyaneshwar Mauli Titel Song )**देखील चर्चा आहे. सोनी मराठी वाहिनीने देखील शीर्षकगीत **(Dnyaneshwar Mauli Titel Song Latest Video)**कशा प्रकारे संगीतबद्ध करण्यात आलं याचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रेक्षकांनी देखील याला चांगली पोचपावती दिली आहे. या व्हिडिओमध्ये शीर्षकगीत कशाप्रकारे तयार करण्यात आली त्यासाठी काय कष्ट घेण्यात आले हे सांगण्यात आले. या शीर्षकगीताला मराठीतील प्रसिद्ध गायिका बेला शेंडे तर अवधूत गांधी आळंदीकर यांनी आवाज दिला आहे. तर देवदत्ता मनीषा बाजी यांनी याचे संगीतकार आहेत. तर या सुंदर शीर्षकगीताचे गीतकार दिग्पाल लांजेकर हे आहेत. दीड मीनिटाचे हा टाईटल ट्रॅक मनाला शांती देतो. सुंदर आवाज त्यासोबत मंत्रमुग्ध करणारे संगीत व गीताची शब्दरचना मनाला स्पर्श करून जाते. तसेच या मालिकेसाठी ज्ञानेश्वर माउलींच्या रचना, ओव्या संगीतबद्ध केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांना एक सुरेल अनुभवही मिळणार आहे. वाचा : ‘Thipkyanchi Rangoli’ या स्टार प्रवाहवरील नव्या मालिकेतून उलगडणार एकत्र कुटुंबाची गोष्ट महाराष्ट्रात आजही अवलंबल्या जात असलेल्या भक्ती संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानदेव ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या या नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दिगपाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. दिगपाल या मालिकेचं दिग्दर्शन देखील करणार आहेत. ज्ञानेश्वर माउलींच्या या चरित्रगाथेतून दिव्यत्वाचं दर्शन अनुभवायला मिळणार आहे.
भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.