मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Chinmay Mandlekar ने 'या' एका कारणासाठी आळंदीत जाऊन घेतली ज्ञानेश्वर माउलींची भेट

Chinmay Mandlekar ने 'या' एका कारणासाठी आळंदीत जाऊन घेतली ज्ञानेश्वर माउलींची भेट

आजपासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी 7 वा. 'ज्ञानेश्वर माउली' ही मालिका सुरू झाली.

आजपासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी 7 वा. 'ज्ञानेश्वर माउली' ही मालिका सुरू झाली.

आजपासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी 7 वा. 'ज्ञानेश्वर माउली' ही मालिका सुरू झाली.

मुंबई,  27 सप्टेंबर 2021 ;   संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या 725व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर  (Dnyaneshwar Mauli)आणि त्यांच्या भावंडाची जीवनगाथा सोनी मराठी वाहिनी (Sony Marathi)घेऊन येत आहे. आजपासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी 7 वा. 'ज्ञानेश्वर माउली' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने आज 27 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेता आणि मालिकेचा निर्माता चिन्मय मांडलेकरने  (Chinmay Mandlekar) आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे.या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडणार आहे. चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून दिग्पाल या मालिकेचे दिग्दर्शन देखील करत आहे.

वाचा : Bigg Boss Marathi 3 मधील 'या' स्पर्धकाने आतापर्यंत 4 वेळा खाल्ली आहे तुरुंगाची हवा

भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिव्यत्वाचे दर्शन अनुभवास मिळणार आहे. संत ज्ञानेश्वर यांनी भिंत कशी चालवली तसेच मुक्ताईने ज्ञानेश्वर माउलींच्या पाठीवर मांडे कसे भाजले, रेड्याच्या तोंडून वेद कसे वधवून घेतले हे फक्त आपण ऐकले व वाचले असेल मात्र आता या दिव्यत्वाचे दर्शन या मालिकेतून आपणास पाहता व अनुभवयास मिळणार आहे.

सोनी मराठी वाहिनीने 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेतील काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर यांनी भिंत कशी चालवली तसेच मुक्ताईने ज्ञानेश्वर माउलींच्या पाठीवर मांडे कसे भाजले हे दाखवण्यात आले आहे. मालिकेतील हे क्षण पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे. आता फक्त मालिका सुरू होण्यासाठी काही तास वाट पाहावी लागणार आहे. कारण आज, 27 तारखेपासून ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे. या चरित्रगाथेतील चमत्कार ग्राफिक्सद्वारे चित्रित होणार आहे.

First published:

Tags: Marathi entertainment