मुंबई 12 मे**:** कोरोनाचं संक्रमण (coronavirus) दिवसेंदिवस वाढतचं चाललं आहे. वाढत्या संक्रमणामुळं लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अगदी नामांकित सेलिब्रिटी देखील कोरोनाच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. नुकतेच अभिनेता भव्य गांधी (Bhavya Gandhi) याच्या वडिलांचं कोरोनामुळं निधन झालं. 10 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत टप्पू ही भूमिका साकारुन लोकप्रिय झालेल्या भव्य गांधीच्या वडिलांना मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 10 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळं त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अखेर डॉक्टरांच्या उपाचारालाही त्यांचं शरीर प्रतिसाद देईनासं झालं. अन् 11 मे रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या निधनामुळं भव्यला जोरदार मानसिक धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्याच्या वडिलांना भावपुर्ण श्रद्धांजली दिली आहे. ‘सोनू सूद किंवा सलमान खानला देशाचे पंतप्रधान करा’; अभिनेत्री नरेंद्र मोदींवर संतापली आज राज्यात 37,326 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले असून राज्यात आज 549 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. मुंबईत आज 1794 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 74 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण 5,90,818 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रविवारी 9 मे रोजी राज्यात एकूण 48 हजार 401 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर त्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा हा 60 हजार 226 एवढा आहे. राज्यात आजपर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 44 लाख 7 हजार 818 एवढी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.