मुंबई,28 एप्रिल- सतत मनोरंजन सृष्टीत काही ना काही घडामोडी घडत असतात. सध्या सोशल मीडियावर साऊथ अभिनेता (South Actor) किच्चा सुदीप (Kichcha Sudeepa) चर्चेत आला आहे. या अभिनेत्याच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे.बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgn) ट्विटने हे प्रकरण वाढलं होतं. त्यांनतर अभिनेता किच्चा सुदीपने ट्विट करत स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
नुकतंच इंडियन एक्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता सोनू सूदने या सर्व प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना अभिनेता सोनू सूद म्हणाला, 'मला नाही वाटत की फक्त हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हटलं जाऊ शकतं. भारताची एकच भाषा आहे आणि ती म्हणजे एन्टरटेनमेन्ट. या गोष्टीने काहीच फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमधून आहात. जर तुम्ही लोकांचं मनोरंजन करत असाल तर ते नक्कीच तुमचा स्वीकार करतील, प्रेम करतील आणि सन्मान देतील'. असं म्हणत अभिनेत्याने आपलं मत दिलं आहे.
साऊथ चित्रपटांच्या यशाबाबत बोलताना अभिनेत्याने पुढे म्हटलं, ''आता मला वाटतं की साऊथ चित्रपटांचं यश हिंदी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये बदल घडवून आणतील. मला वाटतं की आता दिग्दर्शक आणि निर्मात्यांना प्रेक्षकांच्या संवेदना समजून घ्यायला हव्या. कारण ते दिवस गेले जेव्हा लोक म्हणत असत आपलं डोकं घरी ठेऊन चित्रपट पाहायला जा.आता लोक विचारपूर्वक चित्रपटांची निवड करतात. लोकांना कोणत्याही ऍव्हरेज चित्रपटावर पैसे खर्च करायचा नसतो. त्यांना उत्तम हवं असतं'.
'RRR' आणि 'KGF Chapter 2' च्या तुफान यशानंतर, कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप एका कार्यक्रमात पॅन इंडियन चित्रपटांबद्दल बोलताना म्हणाला, "हिंदी आता राष्ट्रभाषा नाही." यावर मोठी खळबळ माजली होती. यावर अजयने आपलं मत व्यक्त करत म्हटलं होतं, '“किच्चा सुदीप माझ्या भावा, तुमच्या मते जर हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन." अजयच्या या ट्विटवर किचा यांनीही आता आपले स्पष्टीकरण दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajay devgan, Entertainment, Sonu Sood, South indian actor