मुंबई, 8 फेब्रुवारी- अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) ‘MTV रोडीज’ (MTV Roadies) चा नवा होस्ट म्हणून रणविजय सिंहच्या (Rannvijay Singh) जागी येणार आहे. या नव्या भूमिकेसाठी तो खूप उत्सुक आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या नव्या भूमिकेबद्दल सांगत चाहत्यांना एक मोठी माहिती देत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोनू सूद पंजाबच्या मोगा येथे एका शेतात उभा असून तो समोसा शोरूममध्ये उभा असल्याचं सांगत आहे. MTV रोडीजच्या शूटिंगसाठी ते दक्षिण आफ्रिकेला जात असल्याचं सोनुने सांगितलं आहे. यावेळी तो समोसा खात एका छोट्याशा चहाच्या टपरीवर उभा असलेला दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेत समोसे मिळतील अशी अभिनेत्याला अपेक्षा नाही, म्हणून त्याला या वेळेचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये सोनू म्हणत आहे, ‘मी रोडीजचा नवा सीजन होस्ट करणार आहे. मी खूप उत्साही आहे कारण शोमध्ये खूप मजामस्ती आणि थरार असणार आहे. या सीजनमध्ये देशातील सर्वोत्तम रोडीज असतील. आणि मी दक्षिण आफ्रिकेत जाण्यापूर्वी काही समोसे घेण्याचा विचार करत आहे. कारण तिथे चाट-समोसा खायला मिळतो की नाही याबद्दल शंका आहे’.
त्यानंतर, सोनू दुकानदाराला बोलावतो आणि विचारतो की तो त्यांच्यासोबत दक्षिण आफ्रिकेला जाणार का? यावर दुकानदार होकार देतो. त्या बदल्यात सोनू त्यांना समोसे मोफत देण्यास सांगतो.तसेच सोनू पुढे म्हणतो , ‘म्हणजे रोडीजना दक्षिण आफ्रिकेतही समोसे मिळू शकतात. तर, रोडीजच्या पुढच्या सीजनसाठी सज्ज व्हा’. (हे वाचा: भाभीजी घर पर हैं’ मधून नेहा पेंडसेची एक्झिट? ‘ही’ अभिनेत्री बनणार नवी ‘गोरी मेम ) व्हिडिओ शेअर करत सोनूने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘रोडीजसोबत माझ्या आयुष्यात एक नवीन थरार सुरु झाला आहे. हा माझ्यासाठी एक प्रकारचा अनोखा प्रवास असेल!’ अभिनेत्याने काही तासांपूर्वी हा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यावर ६ लाखच्या जवळ व्ह्यूज आले आहेत.