मुंबई, 8 फेब्रुवारी- छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय शो ‘भाभीजी घर पर हैं’ (Bhabiji Ghar Par Hain) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी शिल्पा शिंदेने (Shilpa Shinde) या शो ला रामराम केलं होतं. तसेच सौम्या टंडननेही (Saumya Tandon) कोरोना विषाणूच्या महामारीनंतर शोमधून एक्झिट घेतली होती. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसेची (Nehha Pendse) या शोमध्ये एन्ट्री झाली होती. या शोमध्ये ती ‘गोरी मेम’ म्हणजेच ‘अनिता भाभी’ची भूमिका साकारत आहे. नेहाच्या आधी ही भूमिका अभिनेत्री सौम्या टंडनने अनेक वर्ष साकारली होती. परंतु, आता नेहा पेंडसेनेही ‘भाभी जी घर पर हैं’ला रामराम केल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नेहा पेंडसे लवकरच शो सोडणार असल्याचं म्हटलं जात होतं. तर दुसरीकडे निर्मात्यांनी नवीन ‘अनिता भाभी’चा शोध सुरू केल्याचंही वृत्त समोर आलं होतं. पण, आता बातमी अशी आहे की, निर्मात्यांचा नवीन अनिता भाभीचा शोध संपला आहे. अशा परिस्थितीत भाभीजी घर पर हैं या शोमध्ये गोरी मेमची जागा कोणती सौंदर्यवती घेणार? हे जाणून घेण्याची चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आता अभिनेत्री फ्लोरा सैनी शोमध्ये अनिता भाभीच्या भूमिकेत दिसणार आहे. E-Times च्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी ‘अनिता भाभी’ च्या भूमिकेसाठी फ्लोरा सैनीशी संपर्क साधला आहे. आणि जर सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं तर फ्लोरा आता नवीन गोरी मेम बनून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. वास्तविक, सौम्या टंडनने शो सोडल्यानंतर, निर्मात्यांनी फ्लोरा सैनीला ही भूमिका ऑफर केली होती. परंतु नंतर तिने ही भूमिका करण्यास नकार दिला होता.त्यानंतर ही भूमिका नेहा पेंडसेच्या पदरात पडली होती. अद्याप निर्मात्यांनी फ्लोरा सैनीच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. कारण, अभिनेत्रीकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही. फ्लोरा सैनी अनेक मालिकांसह काही मोठ्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. ज्यामध्ये दबंग 2, स्त्री आणि बेगम जान सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये फ्लोरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. (हे वाचा:
इंजिनीअर मंदार कसा बनला आत्माराम भिडे?‘Taarak Mehta’ फेम अभिनेत्याचा रंजक किस्सा
) नेहा पेंडसेने का सोडली मालिका?- नेहा पेंडसेने या शोसाठी एका वर्षाचा करार केला होता. आता तिचा हा करार संपणार असल्याने नेहाची एक्झिट होत आहे. बिझी शेड्युलमुळे नेहाच्या तब्येतीवर परिणाम होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे तिने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.