• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • तरुणानं मागितली मदत; सोनू सूद म्हणाला, ‘भारत ते नेपाळ पळत जाशील, अन्...’

तरुणानं मागितली मदत; सोनू सूद म्हणाला, ‘भारत ते नेपाळ पळत जाशील, अन्...’

लॉकडाउनच्या काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला. सोनू आता केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातील गरीबांना देखील मदत करताना दिसत आहे. नुकतंच नेपाळमधील एका व्यक्तीनं शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याच्याकडे आर्थिक मदत मागितली. (Sonu Sood Helps Nepali Man)

 • Share this:
  कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला. दरम्यान सोनू आता केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातील गरीबांना देखील मदत करताना दिसत आहे. नुकतंच नेपाळमधील एका व्यक्तीनं शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याच्याकडे आर्थिक मदत मागितली. (Sonu Sood Helps Nepali Man )अन् सोनूने देखील त्याला मदत करण्याचं वचन दिलं. त्याच्या या दानशूरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. मदत मागणाऱ्या व्यक्तीचं नाव मधु पैडल असं आहे. नेपाळमध्ये राहणारा हा व्यक्ती गेली 10 वर्ष (Ankylosing Spondylitis) या दुर्मिळ आजारामुळं त्रस्त आहे. यावर उपचार करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. परिणामी त्यानं सोनूकडे आर्थिक मदत करण्याची विनंती केली. अन् सोनूने देखील त्याला मदतीचं वचन दिलं. “अतिथि देव भव: घाबरु नकोस मित्रा, हिंदुस्तानातून नेपाळपर्यंत तू पळत जाशील.” अशा आशयाचं ट्विट करुन त्यानं त्या आजारी व्यक्तीला प्रोत्साहन दिलं. सोनूचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत त्याची तोंड भरुन स्तुती केली आहे. अवश्य पाहा - सोनू सूदकडे चाहत्याने केली विचित्र मागणी; अभिनेत्याचा जबरदस्त रिप्लाय होतोय VIRAL सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने 1500 PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुलं करुन दिलं होतं.
  Published by:Mandar Gurav
  First published: