मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sonu Nigam: 'मी फालतू लोकांसाठी..'; बॉयकॉट बॉलिवूडबाबत सोनू निगमचं मोठं वक्तव्य

Sonu Nigam: 'मी फालतू लोकांसाठी..'; बॉयकॉट बॉलिवूडबाबत सोनू निगमचं मोठं वक्तव्य

सोनू निगम

सोनू निगम

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक सोनू निगम सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सोनू आपल्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त आपल्या खाजगी आयुष्यामुळेदेखील लक्ष वेधून घेत असतो. गायक आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 8 जानेवारी-   बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक सोनू निगम सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सोनू आपल्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त आपल्या खाजगी आयुष्यामुळेदेखील लक्ष वेधून घेत असतो. गायक आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखला जातो. तो सतत सोशल मीडियावर आपलं मत मांडत असतो. बऱ्याच वेळा सोनू आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसून येतो. दरम्यान सोनू आपल्या नव्या मुलाखतीमुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. नुकतंच सोनूने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेत आपलं मत मांडलं होतं.

नुकतंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले होते. उत्तर प्रदेशला 'चित्रपटांसाठी सर्वात अनुकूल राज्य' प्रसारित करण्यासाठी त्यांनी मुबंईत दौरा केला होता. यावेळी अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यामध्ये सुनील शेट्टीपासून राजपाल यादवपर्यंत अनेक कलाकार उपस्थित होते.बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर यांच्या उपस्थित गायक सोनू सूदने सध्या बहुचर्चित बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडवर आपलं मत मांडलं आहे.

(हे वाचा: Shahrukh Khan : दिलदार किंगखान! दिल्लीतील अंजलीच्या कुटुंबियांसाठी शाहरुखने उचललं मोठं पाऊल)

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड चित्रपटांवर वाईट दिवस आल्याचे म्हटल जात आहे. साऊथ चित्रपट दिवसेंदिवस बॉलिवूड चित्रपटांना टक्कर देत बॉक्स ऑफिसवर बाजी मारत आहेत. याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर सतत सुरु असलेला बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड. गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. याचा अनेक बिग बजेट चित्रपटांना फटका बसला आहे. त्यामुळे अक्षय कुमारपासून आमिर खानपर्यंत सर्वच कलाकारांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फ्लॉफचा सामना करावा लागत आहे. बॉयकॉट बॉलिवूडवर अनेक कलाकार सतत आपले विविध मत मांडत असतात.

दरम्यान आता गायक सोनू निगमने बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडवर आपलं परखड मत मांडलं आहे. सोनू निगमने नुकतंच मुंबईमध्ये आलेल्या योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. यावेळी बॉयकॉट बॉलिवूडबाबत बोलताना सोनू निगम म्हणाला, 'मी फालतू लोकांसाठी का बोलू? जर त्यांना कळतच नसेल मला नेमकं म्हणायचंय काय तर बोलून काय फायदा? या क्षेत्रात प्रत्येकाने आपलं मान खाली करून पुढे चालायला हवं. सोशल मीडिया आणि कलाकारांनी करायलाच हवं'. असं म्हणत सोनूने बॉलिवूड कलाकारांना फटकारलं आहे. तर पठाणबाबत विचारलं असता त्याने त्यावर कमेंट करण्यास नकार दिला.

उत्तर प्रदेश फिल्म इंडस्ट्रीला आपल्या मुठीत घेईल का? यावर काय वाटतं? असं सोनूला विचारलं असता, सोनू म्हणाला, 'माझं कुटुंब उत्तर प्रदेशमधील आहे. आता त्याठिकाणी शांती आणि समृद्धी आहे. चांगली गोष्ट आहे की, तिथे फिल्म इंडस्ट्री सुरु होत आहे. परंतु मुंबई आमची आई आहे. मुंबईने सर्वांना काम करण्याची पद्धत शिकवली आहे. मुंबईने कष्ट करायला आणि लढायला शिकवलं आहे'.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Sonu nigam