अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंग या क्षेत्रातून केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कॉलेजमध्ये झालेल्या एका रॅगिंगमुळं तिच्यामध्ये मॉडलिंगची इच्छा निर्माण झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
चिंत्रांगदा बॉब विश्वास नावाचा एक चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या चित्रपटाच्या निमित्ताने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिनं का थक्क करणारा किस्सा सांगितला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
कॉलेजमध्ये असताना एकदा तिच्यासोबत रॅगिंग झाली होती. कॉलेजमधील काही विद्यार्थांनी तिला कपडे उलटे घालून, डोक्यावर पुस्तक आणि हातात बादली घेऊन रँपवॉक करायला सांगितलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
अर्थात घाबरलेल्या चिंत्रागदानं त्यांचा आदेश ऐकला अन् शांतपणे रँपवॉक केलं. त्यावेळी तिनं दाखवलेला आत्मविश्वास पाहून उपस्थित सर्व विद्यार्थी अवाक् झाले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
अनेकांनी तिला मॉडलिंग करण्याचा सल्ला दिला. मित्र-मंडळींनी केलेली स्तुती ऐकून मग तिच्यामध्ये देखील मॉडलिंगची इच्छा निर्माण झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
त्यानंतर तिचा आत्मविश्वास आणखी उंचावला अन् तिनं मॉडलिंगचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकणारी चित्रांगदा आज मॉडलिंगसोबतच सिनेसृष्टीतही कार्यरत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)