मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात' ; सोनाली कुलकर्णीच्या प्रतिक्रियेवर विजू मानेंची अशी होती रिअ‍ॅक्शन

'हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात' ; सोनाली कुलकर्णीच्या प्रतिक्रियेवर विजू मानेंची अशी होती रिअ‍ॅक्शन

मराठी अभिनेता भाऊ कदम, कुशल बद्रिके व सोनाली कुलकर्णी यांचा पांडू हा सिनेमा तुफान गाजत आहे.  नुकताच कुशल बद्रिकेने सोनाली कुलकर्णी हिच्यासोबतचा एख मजेशीर व्हि़डिओ शेअर केला आहे.

मराठी अभिनेता भाऊ कदम, कुशल बद्रिके व सोनाली कुलकर्णी यांचा पांडू हा सिनेमा तुफान गाजत आहे. नुकताच कुशल बद्रिकेने सोनाली कुलकर्णी हिच्यासोबतचा एख मजेशीर व्हि़डिओ शेअर केला आहे.

मराठी अभिनेता भाऊ कदम, कुशल बद्रिके व सोनाली कुलकर्णी यांचा पांडू हा सिनेमा तुफान गाजत आहे. नुकताच कुशल बद्रिकेने सोनाली कुलकर्णी हिच्यासोबतचा एख मजेशीर व्हि़डिओ शेअर केला आहे.

मुंबई, 30 डिसेंबर-​ मराठी अभिनेता भाऊ कदम, कुशल बद्रिके व सोनाली कुलकर्णी यांचा पांडू हा सिनेमा तुफान गाजत आहे. या सिनेमातील भाऊ कदम आणि सोनालीवर चित्रित झालेली गाणी सध्या सोशल मीडियावर देखील धुमाकूळ घालत आहे. प्रत्येक जण या सिनेमातील गाण्यांवर इन्स्टा रील बनवत आहे. एकूणच काय सिनेमा फूल टू हिट झाला आहे. कुशल बद्रिके असेल किंवा सोनाली कुलकर्णी दोघेही सोशल मीडियार नेहमी सक्रीय असतात. नुकताच त्याने सोनाली कुलकर्णी (sonali kulkani ) हिच्यासोबतचा एख मजेशीर व्हि़डिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये पांडू चित्रपटाचे दिग्दर्शक​ विजू माने (viju mane )देखील आहेत.

कुशलने त्याच्या इन्स्टावर सोनाली हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाली म्हणताना दिसत आहे की, ‘बरं झालं की हे मला चित्रपट संपल्यानंतर कळलं, त्यांना मी डिरेक्टर म्हणून सिरियसली घेऊच शकले नसते.​ हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात.’ सोनालीच्या या खुलास्यावर विजू माने आणि उपस्थित असलेले सर्वचजण खळखळून हसायला लागतात. ‘एखादा इमोशनल सिन त्यांनी करून दाखवला असता​,​ तर मी फक्त हसले असते रे त्यांच्या तोंडावर.’ असं सोनाली म्हणताच विजू कदम अंगावरील जॅकेट काढून कुशल बद्रिकेकडे फेकतात.त्यानंतर सोनाली आणि कुशल बद्रिके हसू लागतात.

वाचा-बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर! अर्जुन कपूरनंतर नोरा फतेहीला कोरोनाची लागण

यापूर्वी देखील कुशलने असाच एक मजेदार किस्सा शेअर केला होता. कुशल आणि भाऊ कदम एकत्र केस कापायला जात होते. त्यावेळी भाऊ कदमने त्याचे केस कापून झाले म्हणून​ कुशलचे केस कापतानाचा एक फोटो काढला. नशीब! हे फक्त फोटोवर निभावलं नाहीतर भाऊने माझा केसाने गळा कापला असता​,​ अशी एक मजेशीर पोस्ट शेअर केली होती.

कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांची बॉंडिंग चला हवा येऊ द्या च्या सेटवर सर्वांनीच पाहिली आहे. सिनेमात देखील या दोघांच्या जोडींने अशीच धमाल केली आहे. सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कदम यांच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहत्यांपासून ते सेलेब्स सर्वांनाच या गाण्यांनी वेड लावले आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment, Sonali kulkarni